मनमाड : असे म्हणतात की, लग्नाच्या रेशीम गाठी या स्वर्गात बांधल्या जातात... अशाच जुळून आलेल्या आगळ्या वेगळ्या रेशीम गाठीची मनमाड शहरात चांगलीच चर्चा सुरू आहे. एका अर्थाने या सोहळ्याला क्रांतिकारी विवाह सोहळा म्हणावा लागेल. हा एक पुरुषाने एका स्त्रीशी केलेला विवाह नव्हे तर ही आहे एका पुरुषाने एका तृतीय पंथीय अर्थात किन्नराशी घेतलेल्या सात फेऱ्यांची कहाणी आहे. रूढी-परंपरांचे सामाजिक बंधने झुगारून एका तरुणाने त्याची प्रेयसी असलेल्या किन्नराच्या गळ्यात सर्वांच्या साक्षीने वरमाला घालून मंगळसूत्र बांधले आहे. हा आगळावेगळा विवाह सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. मनमाड शहरातील किन्नरांच्या महंत शिवलक्ष्मी आणि येवला तालुक्यातील तरुण संजय झाल्टे यांची टिकटॉकच्या माध्यमातून ओळख झाली. नकळत या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. सुखी संसाराची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी दोघांनी लग्न करण्याचा निश्चय केला. मात्र, समाज आणि लोक काय म्हणतील, असा विचार दोघांच्याही मनात आला असला तरी प्रेमाच्या ताकदीपुढे हा विचार टिकाव धरू शकला नाही. अखेर दोघे विवाहबंधनात अडकले ते आयुष्यभर एकमेकांना साथ देण्यासाठी. दोघांच्याही परिवाराने दिली संमती दोघांनी आपापल्या परीने प्रयत्न करून घरच्या लोकांना पटवून दिले की, ते एकमेकांशिवाय राहू शकत नाही. त्यांचे एकमेकांवरील प्रेम पाहून अखेर दोघांच्या परिवारातील सदस्यांनी लग्नाला होकार दिला. त्यानंतर महंत शिवलक्ष्मी व संजय झाल्टे या दोघांचा मनमाडपासून जवळ असलेल्या नागापूर येथील नागेश्वर महादेव मंदिरात लग्नसोहळा पार पडला. यावेळी दोघांच्या घरातील काही मंडळी आणि मोजके मित्र उपस्थित होते.
किन्नराच्या एका लग्नाची आगळीवेगळी गोष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 1:00 AM
असे म्हणतात की, लग्नाच्या रेशीम गाठी या स्वर्गात बांधल्या जातात... अशाच जुळून आलेल्या आगळ्या वेगळ्या रेशीम गाठीची मनमाड शहरात चांगलीच चर्चा सुरू आहे. एका अर्थाने या सोहळ्याला क्रांतिकारी विवाह सोहळा म्हणावा लागेल. हा एक पुरुषाने एका स्त्रीशी केलेला विवाह नव्हे तर ही आहे एका पुरुषाने एका तृतीय पंथीय अर्थात किन्नराशी घेतलेल्या सात फेऱ्यांची कहाणी आहे.
ठळक मुद्देपरंपरा झुगारून घेतला क्रांतिकारी निर्णय