रूढी-परंपरांचे सामाजिक बंधने झुगारून एका तरुणाने त्याची प्रेयसी असलेल्या किन्नराच्या गळ्यात सर्वांच्या साक्षीने वरमाला घालून मंगळसूत्र बांधले आहे. हा आगळावेगळा विवाह सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. मनमाड शहरातील किन्नरांच्या महंत शिवलक्ष्मी आणि येवला तालुक्यातील तरुण संजय झाल्टे यांची टिकटॉकच्या माध्यमातून ओळख झाली. नकळत या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. सुखी संसाराची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी दोघांनी लग्न करण्याचा निश्चय केला. मात्र, समाज आणि लोक काय म्हणतील, असा विचार दोघांच्याही मनात आला असला तरी प्रेमाच्या ताकदीपुढे हा विचार टिकाव धरू शकला नाही. अखेर दोघे विवाहबंधनात अडकले ते आयुष्यभर एकमेकांना साथ देण्यासाठी.
इन्फो
परिवारानेही दिली संमती
दोघांनी आपापल्या परीने प्रयत्न करून घरच्या लोकांना पटवून दिले की, ते एकमेकांशिवाय राहू शकत नाही. त्यांचे एकमेकांवरील प्रेम पाहून अखेर दोघांच्या परिवारातील सदस्यांनी लग्नाला होकार दिला. त्यानंतर महंत शिवलक्ष्मी व संजय झाल्टे या दोघांचा मनमाडपासून जवळ असलेल्या नागापूर येथील नागेश्वर महादेव मंदिरात लग्नसोहळा पार पडला. यावेळी दोघांच्या घरातील काही मंडळी आणि मोजके मित्र उपस्थित होते.
कोट
मी पहिली किन्नर आहे, जी सासरी नांदायला जात आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आमची ओळख झाली. त्यात आमच्यात प्रेमाचे संबंध निर्माण झाले. वैदिक पद्धतीने आमचा विवाह पार पडला. एक किन्नर म्हणून नाही तर एक लक्ष्मी म्हणून माझा सासरच्या लोकांनी स्वीकार केला. खरेच याचा मला खूप आनंद आहे. मी एक नवीन पाऊल उचलले आहे.
- महंत शिवलक्ष्मी, मनमाड
फोटो- १७ मनमाड स्टोरी
===Photopath===
170621\17nsk_69_17062021_13.jpg
===Caption===
फोटो- १७ मनमाड स्टोरी