शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

पीकविम्यासाठी धोरणात्मक निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 11:52 PM

पीकविम्याच्या रकमेवरून शेतकऱ्यांमध्ये उद्रेक झाल्याने शेतकरी आणि विमा अधिकाºयांची आयोजित बैठक निष्फळ ठरली. अधिकाºयांनी शासन परिपत्रकाचा आधार घेत सपशेल हात झटकून विमा रकमेचा चेंडू कृषिमंत्री दादा भुसे यांच्या कोर्टात टाकला आहे. त्यामुळे गेल्या वर्षी विमा कंपन्यांविरुद्ध रान पेटविणाºया कृषिमंत्र्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

ठळक मुद्देशेतकरी वाऱ्यावर : रकमेचा चेंडू कृषिमंत्री दादा भुसे यांच्या कोर्टात

सटाणा : पीकविम्याच्या रकमेवरून शेतकऱ्यांमध्ये उद्रेक झाल्याने शेतकरी आणि विमा अधिकाºयांची आयोजित बैठक निष्फळ ठरली. अधिकाºयांनी शासन परिपत्रकाचा आधार घेत सपशेल हात झटकून विमा रकमेचा चेंडू कृषिमंत्री दादा भुसे यांच्या कोर्टात टाकला आहे. त्यामुळे गेल्या वर्षी विमा कंपन्यांविरुद्ध रान पेटविणाºया कृषिमंत्र्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.गेल्या वर्षी शिवसेनेचे प्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल करून संपूर्ण महाराष्ट्रात पीकविमा कंपन्यांविरु द्ध रान उठविले होते. त्यातच यंदा मका, बाजरी पिकावर लष्करी अळीच्या आक्र मणामुळे संपूर्ण पीकच उद्ध्वस्त होऊन शेतकरी आर्थिक संकटात सापडला.या संकटाशी सामना करत असताना अवकाळी पावसाने थैमान घातल्यामुळे कडधान्य, बाजरी, मका आदींसह कांदा पिकासह डाळिंब, द्राक्ष पिकाची अक्षरश: माती झाली. या आसमानी संकटामुळे शेतकºयांचे होत्याचे नव्हते झाले. अशी भयावह परिस्थिती असताना सत्तास्थापनेच्या नादात पीकविमा कंपनीविरु द्ध लढा देणाºया शिवसेनेने शेतकºयांनाच वाºयावर सोडल्याचे चित्र आहे. बागलाण तालुक्यात शेकडो शेतकºयांनी यंदा पीक संरक्षण विमा काढला आहे. पंधरा दिवसांपूर्वी काही डाळिंब उत्पादक शेकºयांच्या खात्यावर पीकविम्याचे अवघे साडेअकरा हजार रु पये प्राप्त झाल्याने शेतकºयांमध्ये संतापाची लाट उसळली. शेतकºयांना दिलेल्या तुटपुंज्या रकमेमुळे विमा कंपन्यांचे बिंगच फुटले. या फसवणुकीमुळे शेतकºयांमध्ये उद्रेक होऊन संतप्त शेतकºयांनी तहसील कार्यालयात गोंधळ घातला होता. तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटील यांनी शेतकरी आणि विमा कंपनांच्या अधिकाºयांची एकत्र बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीत अधिकारीच अनभिज्ञ असल्याचे आढळून आल्याने दुसºया दिवशी विमा कंपन्यांच्या प्रमुख अधिकाºयांची बैठक बोलावलीहोती.या बैठकीत पीकविमा कंपनीचे प्रमुख भुसारे एसबीआय विमा कंपनीचे अधिकारी साहेबराव पाचपुते, तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार यांनी उपस्थित शेतकरी प्रतिनिधी बिंदू शर्मा, सुधाकर पाटील यांच्यासह तीनशेहून अधिक शेतकºयांना शासन परिपत्रकानुसारच विमा कंपन्यांनी भरपाई दिल्याचे सांगून आपण कृषिमंत्र्यांकडे कैफियत मांडावी असा सल्ला दिला. त्यामुळे दुसरी बैठक निष्फळ ठरून अधिकाºयांनी विमा रकमेचा चेंडू कृषिमंत्री दादा भुसे यांच्या कोर्टात टाकला.विमा कंपनीचे अधिकारी व कृषी अधिकाºयांनी विमा रकमेचा चेंडू कृषिमंत्र्यांच्या कोर्टात टाकल्यानंतर बिंदू शर्मा, सुधाकर पाटील, संदीप वाघ, संजय गुंजाळ, विश्वास सोनवणे यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे धाव घेऊन विमा कंपन्यांनी शेतकºयांची कशा पद्धतीने फसवणूक करण्यात आली हे निदर्शनास आणून दिले. फसवणूक करणाºया विमा कंपन्यांवर गुन्हे दाखल करून शेतकºयांना ६६ हजार रु पये भरपाई द्यावी अशी मागणी केली. भुसे यांनी विमा कंपन्यांची चौकशी करून या पुढे पीकविम्यासाठी धोरणात्मक निर्णय घेतले जातील, असे आश्वासन दिले. शेतकºयांना योग्य भरपाई मिळेल, असेही ते म्हणाले. कृषिमंत्री भुसे याबाबत विधिमंडळाच्या अधिवेशनात काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रCrop Insuranceपीक विमा