.---------------------------------------------
रसवंत्या लागल्या सजू
मालेगाव : शहर परिरसरात उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढू लागला असून, नागरिक उकाड्याने हैराण होत आहेत. भरदुपारी नागरिक उन्हापासून बचावाकरिता रसवंत्यांचा आसरा घेत आहेत. शहरात ठिकठिकाणी रसवंत्या सजू लागल्या असून, नागरिक त्यावर गर्दी करू लागले आहेत.
----------------------------------------------------------
कोरोना वाढू लागल्याने दहशत
मालेगाव : शहर परिसरात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले असून नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. वयोवृद्ध नागरिक घराबाहेर निघणे टाळत असताना तरुण वर्ग मात्र तोंडाला मास्क न लावताच फिरत असल्याचे दिसून येत आहे. बाजारात खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत असून, हॅाटेल्स आणि खाद्यपदार्थांच्या दुकानांवरील गर्दी टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
--------------------------------
सिग्नलमुळे वाहनांच्या रांगा
मालेगाव : शहरातील मोसम पूल चौकात लावलेल्या सिग्नलमुळे सटाणा, कॅम्प, संगमेश्वर आणि नवीन बसस्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. बाहेरगावी जाणाऱ्या आणि बाहेरगावाहून शहरात प्रवेश करणाऱ्या अवजड वाहनांची भली मोठी रांग लागत असल्याने पादचाऱ्यांसह दुचाकीस्वारांना मार्ग काढणे अवघड होत आहे.