शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
2
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
3
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
4
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
5
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
6
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
7
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
8
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
9
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
10
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
11
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
12
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
13
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
14
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
15
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
16
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
17
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
18
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
19
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
20
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय

‘ऑन स्ट्रीट पार्किग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 12:39 PM

शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मनपा कार्यालयातील पार्किंगची जागा संध्याकाळी ७ वाजेपासून ते रात्री १ वाजेपर्यंतदेखील उपलब्ध होऊ शकते. भले सदर पार्किंग ‘पे अ‍ॅण्ड पार्क’ हा उपक्रमदेखील राबविण्यात आली तर रात्रीचे पिकअवरमध्ये शहरातील रहदारी आणि पार्किंग प्रश्न मार्गी लागतील आणि शहर सुटसुटीत दिसेल.

हेमंत गायकवाड

शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मनपा कार्यालयातील पार्किंगची जागा संध्याकाळी ७ वाजेपासून ते रात्री १ वाजेपर्यंतदेखील उपलब्ध होऊ शकते. भले सदर पार्किंग ‘पे अ‍ॅण्ड पार्क’ हा उपक्रमदेखील राबविण्यात आली तर रात्रीचे पिकअवरमध्ये शहरातील रहदारी आणि पार्किंग प्रश्न मार्गी लागतील आणि शहर सुटसुटीत दिसेल. मुख्य बाजारपेठ असलेल्या रस्त्यांवर चारचाकी वाहनबंदी करून शहराच्या बाहेर ‘पार्किंग झोन’ तयार करायला हवे व तेथून पाब्लिक ट्रान्सपोर्ट किंवा पार्किंग झोनपासून तर बाजारपेठेपर्यंत डेकोरेटिव्ह फुलांनी, बेटांनी, झाडांनी नटलेला रस्ता, पाथवे तयार करावा. जेणेकरून पायी चालण्याची मजा घेता येईल व शहरदेखील सुटसुटीत दिसेल. परदेशात असे उपक्रम राबविले जात आहेत. सोमाणी उद्यान व तेथील रस्त्याचे नव्याने आराखडा तयार करून नियोजन केल्यास नाशिकरोडच्या सौंदर्यात भर पडण्यास मदत होईल. येणाऱ्या काही वर्षांत नाशिक शहर हे राज्यातलेच नव्हे, तर देशामध्ये एक मोठे शहर तर असेलच, हवामानाच्या दृष्टीने येणाºया १० वर्षांत ‘नाशिक जिल्हा’ व ‘नाशिक शहर’ स्मार्ट सिटीकडे वाटचाल करीत आहे. ज्यावेळेस शहर वाढते, लोकसंख्या वाढते याचा सर्व ताण रहदारीवर व पार्किंगवर येणार हे कुठल्याही पंडिताने सांगणे गरजेचे नाही. ‘नाशिक महानगरपालिके’कडून शहराचे नियोजन होत असते. वाढत्या विस्ताराचा विचार केल्यास शहरावर नक्कीच ताण वाढणार त्यादृष्टीने नियोजन होणे गरजेचे आहे.रहदारी व पार्किंग समस्या सोडविण्यासाठी बरेच मनपा सदस्य प्रश्न मांडत असतात. नियोजन करीत असतात. आॅन स्ट्रीट पार्किंग ही सर्वात महत्त्वाची योजना आहे. महाराष्टÑ राज्य अधिनियम २१० (अ) अन्वये वाणिज्य इमारती, रेसिडेन्सी इमारत, या समोरील (रोडलगत) जी मार्जीनल स्पेस (मोकळी जागा) सोडलेली असते यापैकी काही क्षेत्र १.५ मीटर/२.०० मीटर क्षेत्र हे रस्त्यात सामावून घ्यायचे व रस्ता विस्तारित करीत असताना या जागेमध्ये रस्त्यालगत ‘चारचाकी’ गाडी वळण्यासाठी जागा उपलब्ध होते त्यामुळे सदर वाहनधारक त्याचे काम उरकून तातडीने निघून जातो. रहदारीला अडथळा निर्माण होत नाही. याला ‘आॅन स्ट्रीट पार्किंग’ असे म्हणतात. विदेशात अनेक ठिकाणी अशा पार्किंग व्यवस्था आहेत. नाशिक रोजच्या नगरसेवक संगीता गायकवाड यांचा प्रायोगिक तत्त्वावर रेजिमेंटल प्लाझा ते गायकवाड मळा रस्ता यावर हा प्रस्ताव राबविण्याचा मानस आहे. नाशिक मनपाने नुकतेच यासंदर्भात धोरण जाहीर केले आहे. यामुळे येणाºया काळात असे उपक्रम राबविण्यास लवकरच सुरुवात होणार यात शंका नाही.दुसरा प्रस्ताव नुकताच संगीता गायकवाड यांनी आयुक्तांना सादर केला. तो असा की, नाशिक मनपाच्या ताब्यात अनेक ओपन स्पेस आहेत. सदर ओपन स्पेसमध्ये यापूर्वी नुसतेच उद्याने, सभागृह, अभ्यासिका, मंदिर असे निर्माण झालेले आहे. काही ओपन स्पेस आजही तशाच पडून आहेत. अशा ओपन स्पेसमध्ये जर पार्किंगची संकल्पना राबविल्यास मोठी समस्या दूर होण्यास मदत होईल.कॉलनीमधील असलेल्या मोकळ्या जागांवर पार्किंग व्यवस्था झाल्यास कॉलनी रस्ते सतत मोकळे राहतील. यामुळे रहदारीवर होणारा ताण कमी होण्यास मदत होईल.इथून पुढे रस्ते विकसित करण्याकामी कॉलनी लेन ही ३.८ मीटरची असते. जिथे टू वे असेल असे रस्ते विकसित करताना १२ मीटर रस्ता असेल तर यापैकी ७.६ मीटर जागा ही येण्या-जाण्यासाठी उपलब्ध होईल, आणि उरलेले ४.४ मीटर क्षेत्र हे पाथवे आणि ‘आॅन स्ट्रीट पार्किंग’साठी उपलब्ध होऊ शकेल. कारण या जागेव्यतिरिक्त अधिनियम २१० (अ) मिळणारे ६ ते ३ मीटरचे क्षेत्रदेखील असेल. त्यामुळे रस्त्यांचे नियोजन अगदी व्यवस्थित करण्यास कुठेही अडचण येणार नाही. भविष्यात होणारा विकास बघता शहरातील बाजार पेठेमध्ये मनपा, मालकीच्या इमारती किंवा मोकळे भूखंड उपलब्ध असल्यास अशा ठिकाणी ‘मॅकेनिझम पार्किंग’ची देखील सुविधा उपलब्ध होऊ शकते.नाशिकरोड पार्किंग समस्याबिटको ते देवळालीगाव गांधी पुतळा, बिटको ते शिवाजी पुतळा, शिवाजी पुतळा ते आंबेडकर पुतळा व बिटको ते जेलरोड या प्रमुख रस्त्यांचा केंद्रबिंदू बिटको चौक आहे. नागपूर पॅटर्नवर आधारित रस्ते तयार करण्यात आले असले तरी त्या रस्त्यावरील फूटपाथ साधारण १ फूट उंचीचे असल्याने पार्किंगची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. दुकानासमोरील मोकळी जागा ही खºया अर्थाने तेथे येणाºया ग्राहकांसाठी पार्किंगकरिता सोडलेली आहे. परंतु रस्त्यापेक्षा उंच असलेल्या फुटपाथमुळे ग्राहकांच्या गाड्या या दुकानापुढील मोकळ्या जागेत जाऊ शकत नाही. त्यामुळे त्या रस्त्यावर उभ्या कराव्या लागत असल्याने वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे सर्वप्रथम प्रमुख हमरस्त्यावरील फूटपाथ रस्त्यासमान केल्याने ग्राहकांच्या वाहनांना दुकानापुढील जागेत लावणे शक्य होईल. त्यामुळे काही प्रमाणात रस्त्यावरील वाहतुकीची निर्माण होणारी कोंडी मार्गी लागेल.छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते डॉ. आंबेडकर पुतळा येथेदेखील पार्किंगचा प्रश्न असून, तेथेदेखील अशाच प्रकारे नियोजन केल्यास पार्किंगचा प्रश्न मार्गी लागू शकतो. राज्य शासनाच्या अखत्यारित असलेल्या गोरेवाडी रस्त्यावरील डिस्लरी भागातील पडिक असलेली जागा मनपाकडे वर्ग केल्यास त्या ठिकाणी पार्किंग, छोटे मार्केट उभारल्यास शिवाजी पुतळा परिसर, देवी चौककडे जाणारा रस्ता मोकळा श्वास घेण्यास मदत होऊ शकते. 

 

टॅग्स :Nashikनाशिक