काँग्रेसचे तालुक्यात संघटन बळकट करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2020 05:37 PM2020-09-03T17:37:49+5:302020-09-03T17:39:10+5:30

कळवण : कळवण तालुका एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता, त्यामुळे काँग्रेस पक्षाचे विचार गावागावात तळागाळापर्यंत पोहचवून आगामी काळात तालुक्यात पक्षाचे संघटन बळकट करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रयत्नशील रहावे असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष मुजफ्फर हुसेन यांनी केले.

Strengthen the organization of Congress in the taluka | काँग्रेसचे तालुक्यात संघटन बळकट करा

काँग्रेसचे तालुक्यात संघटन बळकट करा

Next
ठळक मुद्देमुजफ्फर हुसेन : कळवणला पदाधिकारी, कार्यकर्त्यांची आढावा बैठक

कळवण : कळवण तालुका एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता, त्यामुळे काँग्रेस पक्षाचे विचार गावागावात तळागाळापर्यंत पोहचवून आगामी काळात तालुक्यात पक्षाचे संघटन बळकट करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रयत्नशील रहावे असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष मुजफ्फर हुसेन यांनी केले.
हिरे भवन मध्ये आयोजित कळवण तालुका आढावा बैठकी प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे तर प्रमुख अतिथी म्हणून प्रदेश सरचिटणीस राजाराम पानगव्हाणे,नाशिक काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर, दिगंबर गीते, रमेश कहांडोळे, भरत टाकेकर, ज्ञानेश्वर गायकवाड, स्वप्नील पाटील उपस्थित होते.
काँग्रेसचा संघटनात्मक आढावा घेऊन आगामी निवडणुकांच्या दृष्टीने पक्ष संघटन बळकट करण्यासाठी आत्तापासून कामाला लागण्याच्या सूचना हुसेन यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केल्या. तालुकाध्यक्ष महेंद्र हिरे यांनी कळवण तालुक्यातील पक्ष कामकाजाबाबत माहिती दिली.
बैठकीस प्रदेश उपाध्यक्ष सुमित्रा बहिरम, नगरसेवक मयुर बहिरम, सुरगाणा तालुकाध्यक्ष सखाराम भोये, प्रभाकर पाटील, मोयोद्दिन शेख, परशुराम पवार, बळीराम देवरे, रामा पाटील, बाजीराव खैरनार, रामदास देवरे, गोरख बोरसे, पंकज जाधव, भूषण देशमुख आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

तत्काळ नियुक्त्या करा ...
कळवण तालुक्यात पक्षाचे संघटन वाढविण्यासाठी काँग्रेसच्या विविध सेलचा आढावा बैठकीत घेण्यात आला. विविध सेलचे काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची तात्काळ नियुक्ती करण्याची सूचना काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष मुजफ्फर हुसेन यांनी बैठकीत दिली. रिक्त असलेल्या पदांवर आठ दिवसात योग्य कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या करण्यात येतील अशी ग्वाही तालुकाध्यक्ष महेंद्र हिरे यांनी बैठकीत दिली.

Web Title: Strengthen the organization of Congress in the taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.