येवला : सामाजिक कामात युवकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ होण्यात राष्ट्रीय सेवा योजनेचा मोलाचा वाटा आहे. समाजासाठी उपयुक्त कामे करण्यासाठी युवकांंनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन शहर पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी केले.कोटमगाव देवीचे येथे जगदंबा शिक्षण संस्थेच्या एसएनडी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रासेयोच्या विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जगदंबा शिक्षण संस्थेचे सरचिटणीस लक्ष्मण दराडे होते. व्यासपीठावर सुनील पवार, प्रसाद गुब्बी, देशपांडे, नामदेव माळी, रावसाहेब कोटमे, सुभाष भालेराव, इमाम कादरी, लक्ष्मण वाघ, गंगाधर पुतळे, डॉ. हरी कुदळ उपस्थित होते. बाबासाहेब आभाळे, ललित घाडगे, अश्विनी मोरे, नीता मोरे, प्रा. गोरखनाथ काथेपुरे, प्रा. माधव बनकर आदींनी संयोजन केले. प्रास्ताविक दीपक मढवई यांनी केले. यावेळी गणपत धनगे, नितीन साळवे, संजय करंजकर, भाऊसाहेब जाधव, संदीप ठाकरे, सुनील पवार, अमोल पवार, संतोष आहेर, मोहित गवारे, सोमनाथ डुबे, बाबासाहेब गाडेकर, शुभम देवकर, अजय अदमाने, दीपक जाधव, सुवर्णा खापटे, अफसाना कादरी, जयश्री आहेर, रचना भागवत, सुखदा देवगावकर, ज्ञानेश्वर चव्हाण, नवनाथ सुराळकर, श्रावण गायकवाड, किरण मुंढे, गौरव पवार, कुणाल भावसार आदी उपस्थित होते. विनोद गुडघे व ऋ षिकेश निकम यांनी सूत्रसंचालन केले. एस. टी. खैरनार यांनी आभार मानले.
राष्ट्रीय सेवा योजनेतून सामाजिक बांधिलकी दृढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2020 10:17 PM
येवला : सामाजिक कामात युवकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ होण्यात राष्ट्रीय सेवा योजनेचा मोलाचा ...
ठळक मुद्देकोळी : कोटमगाव देवीचे येथे एसएनडी महाविद्यालयाच्या शिबिराचा समारोप