ठळक मुद्देनियमांचे उल्लंघन करतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई
दिंडोरी: शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्यापारी व व्यवसायिकांची बैठक दिंडोरी नगरपंचायत सभागृहात आयोजित करण्यात आली होती.
व्यापाऱ्यांनी सकाळी सात ते सायंकाळी सात यावेळात दुकाने सुरू ठेवावीत, ग्राहकांना मास्क लावण्यास सांगावे, हॉटेल पन्नास टक्के क्षमतेने रात्री नऊ वाजेपर्यंत सुरू ठेवावीत, सॅनिटायझरचा वापर करावा आदी नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याच्या यावेळी सुचना देण्यात आल्या.जे व्यापारी या नियमांचे उल्लंघन करतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशारा मुख्याधिकारी नागेश येवले यांनी बैठकीत दिला. यावेळी व्यापाऱ्यांनी काही सूचना मांडत प्रशासनास सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. बैठकीस शहरातील व्यापारी नगरपंचायतीचे अधिकारी उपस्थित होते.