शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

नाशकात कठोर निर्बंधांचे काटेकोर पालन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 4:14 AM

--- नाशिक : शहर व परिसरात नागरिकांनी शनिवारी कडक निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करत कोरोनाची साखळी खिळखिळी करण्यासाठी पुढाकार घेतल्याचे ...

---

नाशिक : शहर व परिसरात नागरिकांनी शनिवारी कडक निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करत कोरोनाची साखळी खिळखिळी करण्यासाठी पुढाकार घेतल्याचे चित्र पहावयास मिळाले. दिवसभर शहरात सर्वच दुकानांचे शटर डाऊन अन् रस्ते सामसूम होते. बाजारपेठांमध्येही शुकशुकाट पसरलेला होता.

राज्य शासनाच्या शनिवार, रविवारच्या (विकेंड लॉकडाऊन) आदेशाबाबत नागरिकांमध्ये संभ्रमावस्था होती. एकीकडे शासनाने जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीला सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत शनिवार, रविवारीही मुभा दिली असली तरी दुसरीकडे शहरात सर्वत्र पोलिसांकडून सरसकट दुकाने बंद करण्याचा खाकीच्या शैलीत तगादा लावला जात असल्याने नागरिकांनी बहुतांशी भागात जीवनावश्यक वस्तूंची दुकानेही बंद ठेवणे पसंत केले होते.

शहरात सकाळपासूनच सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी गस्त वाढवून उद्घोषणा करत विक्रेत्यांना दुकाने बंद करण्याबाबत सूचना करण्यास सुरुवात केली. फेरीवाले फळे, भाजी विक्रेत्यांनासुद्धा बहुतांश उपनगरांमध्ये मज्जाव करण्यात आला होता. नागरिकांनाही अत्यावश्यक कारणांव्यतिरिक्त घराबाहेर पडण्यास परवानगी नसल्याचे पोलिसांकडून गल्लीबोळात गस्त करुन उद्घोषणेद्वारे सांगितले जात होते. दिवसभर शहर व परिसरात पोलीस वाहनांचा सायरन घुमत असल्याने नागरिकांनीदेखील घराबाहेर पडणे टाळले. यामुळे सकाळपासून रात्रीपर्यंत मुख्य शहरी भागांसह उपनगरीय परिसरातील रस्ते निर्मनुष्य झाले होते.

दवाखाने, मेडिकल, डायग्नोस्टिक सेंटर, जनावरांची दवाखाने वगळता सर्वच दुकाने बंद होती. बहुतांश भागांत किराणा दुकानेही व्यापाऱ्यांनी बंद ठेवणे पसंत केले.