शहरं
Join us  
Trending Stories
1
काही लोकांनी धोकेबाजी करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
2
“जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
3
महाराष्ट्रातील मुस्लिमांनी पुन्हा तोडले ओवेसींचे स्वप्न; MIM ला 1 टक्काही मते मिळाली नाही
4
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
5
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
6
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
7
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
8
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
9
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
10
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: नाना पटोलेंचा अखेर विजय; २०८ मतांनी भाजप उमेदवाराचा पराभव
12
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचे आमदार
15
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
16
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय
17
"अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल’’, दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
18
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
19
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला
20
Maharashtra Election Results: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं का? दिवीजा फडणवीस म्हणाली...

सप्तशृंग गडावर प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2018 5:04 PM

कळवण : उत्तर महाराष्ट्रचे आराध्य दैवत, साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धेपीठ असलेल्या सप्तशृंगी देवीच्या नवरात्रोत्सवाला रविवारी (दि.१०) घटस्थापनेने सुरुवात होत असून गुरुवार (दि.१८) आॅक्टोबर या कालावधीत नवरात्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे . २३ व २४ आॅक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा, कावडयात्रोत्सव संपन्न होत आहे. त्यादृष्टीने प्रशासकीय यंत्रणा, सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे.

ठळक मुद्देनवरात्रोत्सव : प्रशासकीय यंत्रणा सज्ज; ट्रालीचे आकर्षण

कळवण : उत्तर महाराष्ट्रचे आराध्य दैवत, साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धेपीठ असलेल्या सप्तशृंगी देवीच्या नवरात्रोत्सवाला रविवारी (दि.१०) घटस्थापनेने सुरुवात होत असून गुरुवार (दि.१८) आॅक्टोबर या कालावधीत नवरात्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे . २३ व २४ आॅक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा, कावडयात्रोत्सव संपन्न होत आहे. त्यादृष्टीने प्रशासकीय यंत्रणा, सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे.या नवरात्रोत्सवात प्लस्टीक बंदीची कडक अंमलबजावणी करण्यात येणार असून सप्तशृंगी निवासनी देवी ट्रस्टने देवी भक्तांच्या व भाविकांच्या सुरक्षितेसाठी सहा कोटी रु पयांचा अपघाती विमा उतरविला आहे. भगवती मंदिर परीसरात होणारी बोकड बळीची पारंपारीक प्रथा बंदच करण्यात आली आहे. नवरात्रोत्सवात खासगी वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे, नांदुरी येथून सप्तश्रुंग गडावर जाण्यासाठी दर ५ मिनिटाला परिवहन महामंडळाच्या बसेस भाविकासासाठी उपलब्ध राहणार आहेत. भाविकांच्या सोयी सुविधा व सुरक्षाविषयक जबाबदारी पार पडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा, सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट, सप्तशृंग गड व नांदुरी ग्रामपंचायत यात्रा कालावधीत भाविकांना सोई-सुविघा देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून देवीभक्त व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया, तहसीलदार कैलास चावडे यांनी केले आहे. राज्याच्या विविध भागातून येणाऱ्या लाखो भाविकांसाठी सप्तशृंगी निवासिनी देवी न्यासाने धर्मशाळेच्या खोल्या, राजराजेश्वरी इमारतीच्या खोल्या व सभागृह उपलब्ध करून दिले जाणार आहे. पहिल्या पायरीपासून मंदिराच्या सभामंडपापर्यंत साफसफाई व रंगरंगोटी करण्यात आली आहे. गाभारा, दरवाजे, चांदीची महिरप यावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. भाविकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. तसेच मेटल डिटेक्टर दरवाजे व हॅण्ड डिटेक्टरच्या तपासणीतून जावे लागणार आहे. एका मिनिटाला सर्वसाधारणपणे ६० ते ७० भाविक दर्शन घेवून बाहेर पडतील असे नियोजन करण्यात आहे. सुरक्षेच्या दृष्टीने मंदिर व परिसरात महत्वाच्या अनेक ठिकाणी सीसीटीवी कॅमेरे बसविण्यात आले आहेत. नांदुरी ते सप्तंशृग गड दरम्यान एस टी बसची सोय करण्यात आली आहे. गडाच्या पायथ्याशी व गडावरील जलशुद्धीकरण केंद्राजवळील जागेत तात्पुरते बसस्थानक उभारण्यात आले आहे. याठिकाणी पिण्याचे पाणी,प्रसाधनगृहाची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती सप्तश्रुंग निवासिनी देवी ट्रस्टच्या सूत्रांनी दिली .२४ तास मंदीर खुले---नवरात्रोत्सव कालावधीत श्री भगवती मंदीर भाविकांच्या दर्शनासाठी २४ तास खुले ठेवण्यात येणार आहे. भाविकांच्या मदतीसाठी मध्यवर्ती नियंत्रण कक्षाची स्थापना ट्रस्ट कार्यालयात करण्यात आली आहे. या नियंत्रण कक्षात सर्व विभागांचे प्रत्येकी एक अधिकारी २४ तास उपलब्ध राहणार आहेत. भाविकांसाठी नवरात्रोत्सव कालावधीत मोफत महाप्रसादाची व्यवस्था तर व्हीआयपींसाठी सशुल्क भोजन कक्ष सुरु करण्यात आला आहे अशी माहिती श्री सप्तशृंग निवासनी देवी ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांनी दिली.बोकड बळीची प्रथा बंदच---पशुहत्या रोखण्यासाठी कोर्टानेच बंदी घातली असल्याने नवरात्रौत्सवाच्या सांगता दरम्यान विजयादशमीच्या दिवशी परंपरेनुसार भगवती मंदिरात परिसरामधील बोकड बळी व न्यासाच्या सुरक्षारक्षकाकडून बंदुकीची फैरी झाडण्याची प्रथा कायमस्वरूपी बंद करण्यात आली आहे. मंदिर परिसरात बोकड बळी केल्यास त्यावर गुन्हा दाखल करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे.