मालेगाव : नाशिक, धुळे, पुणे जिल्ह्यातून आठ दुचाकी चोरणाऱ्या अट्टल दुचाकी चोर इम्रानखान लुकमानखान ऊर्फ इम्रान लुक्क्या (३२) रा. राजानगर, चुनाभट्टी याला येथील प्रथम वर्ग न्यायालयाचे न्यायदंडाधिकाºयांनी ३ वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे.१२ जून २०१७ रोजी सोयगाव भागातील रहिवासी नानाजी भामरे यांची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्हा पोलीसप्रमुख संजय दराडे, अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू होता. स्थानिक गुन्हे शाखेचे संदीप दुनगहू यांच्या पथकाने इम्रानखान लुकमानखान ऊर्फ इम्रान लुक्क्या याला अटक केली होती. त्याने आठ दुचाकी चोरल्याची कबुली दिली होती. तपास अधिकारी डी. के. पाचोरकर यांनी आरोपींविरूद्ध सबळ पुरावे गोळा करून येथील न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायालयाने इम्रान लुक्क्या याला तीन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली आहे. सरकारी पक्षातर्फे अॅड. संजय सोनवणे यांनी कामकाज पाहिले.
अट्टल दुचाकी चोरट्याला सक्त मजुरीची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 1:30 AM