लासलगाव : काही दिवसांपूर्वीच कोरोनाबाधित रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतल्यानंतर लासलगावकरांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र, बुधवारी रात्री बावन्न वर्षीय भाजीपाला विक्र ेत्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह येताच शहरवासीयांचा आनंद हवेत विरला आहे. शहरात बेमुदत कडकडीत लॉकडाउन सुरू करण्यात आले आहे.लासलगावसह विष्णुनगर येथील कोरोनाग्रस्त पेशंट बरे झाल्याचे वातावरण असतानाच गुरुवारी लासलगाव येथील मुंबई येथे भाजीपाला वाहनातून नेणाऱ्या बावन्न वर्षीय व्यक्तीस कोरोना झाल्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आता परत गजबजलेली लासलगाव बाजारपेठ बंद करण्यात आली आहे. नवीन नियमानुसार कटेंन्मेंट क्षेत्र १०० मीटरचे असून, यामध्ये असणारे व्यवसाय बंद राहणार आहेत. तर झोन बाहेर असलेले व्यवसाय सुरू असतील, असे लासलगाव ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी शरद पाटील यांनी सांगितले.संबंधित कोरोनाबाधित रुग्णाचा मूळ व्यवसाय हॉटेलचा आहे, परंतु लॉकडाउनमुळे हॉटेल व्यवसाय बंद झाल्याने ते परिवाराचा चरितार्थ चालविण्यासाठी वाहनातून मुंबई येथे भाड्याने भाजीपाला विक्र ीला नेत होते. तीन दिवसांपूर्वी सदर रुग्णाला खोकल्याचा त्रास वाढल्याने तपासणी करून निमगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. साहेबराव गावले यांनी या रुग्णास नाशिक येथे उपचारासाठी पाठविले होते. त्याचा स्वॅब कोरोना पॉझिटिव्ह आल्याने सुखावलेले व्यावसायिक आता व्यवसाय किती कालावधीसाठी बंद राहील या विवंचनेत आहेत.निमगाव वाकडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. साहेबराव गावले यांनी सदर रुग्ण मुंबईहून परतल्यापासून होम क्वॉरण्टाइन होते. दरम्यान लासलगावचे सहायक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे यांनी लासलगाव येथील कोरोनाग्रस्त रुग्णामुळे संबंधित परिसर लॉकडाउन केला जाणार असून, नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन केले आहे.निफाड तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन काळे यांनी बाहेरगावाहून आलेले नैताळे व पिंपळगाव बसवंत येथील रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत असे सांगितले. निफाड तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णामुळे आरोग्य यंत्रणा गतिमान झाली आहे. निफाड तालुक्यातील इतर चार रुग्ण लासलगाव येथील विशेष कोरोना केंद्रात उपचार घेत असून, त्यांची प्रकृती सुधारली आहे असे डॉ. राजाराम शेंद्रे यांनी सांगितले.