कोरोना आणखी झपाट्याने वाढणार असल्याचा निष्कर्ष आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी काढला आहे. त्यामुळे असलेले निर्बंध अधिक काटेकोर आणि कठोर करण्यात आलेले आहे. यामध्ये नागरिकांनी तसेच विविध प्रकारच्या आस्थापनांनी नियमांचे पालन करावे अशा सुचना पालकमंत्र्यांनी केल्या आहेत. जिल्ह्यात यापूर्वीच काही निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत आता त्यामध्ये काही प्रमाणात बदल होणार आहे. त्यानुसार मॉल्स, हॉटेल्स, शाळा,जिम, पार्लर हे बंद राहाणार आहेत. निर्बंधाची अंमलबजावणी करण्यासाठी कलम १४४ लागू करण्यात येणार आहे.
कार्यालयांमध्ये केवळ ५० टक्के क्षमतेने कर्मचारी असावेत शक्यातो वर्कफ्रॉम होम करण्याच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत. जी कार्यालये सुरू राहातील तेथे ‘ नो व्हीजिटर्स’ नियमाची अंमलबजावणी करण्याच्या सुचना पालकमंत्र्यांनी केल्या.उद्योग व्यवसाय सुरू राहतील, मात्र यासाठी कोरोना नियमांचे पालन करून कर्मचाऱ्यांना कामावर बोलविण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
--इन्फो--
कोरोना बाधित सोसायट्यांना दंड
कोरेानाबाधित असलेल्या सोसायटी इमारतींमध्ये नियमांचे पालन होत नसेल तर त्यांना देखील दहा हजाराचा दंड केला जाऊ शकतो. त्यामुळे त्यांनी नियमांचे पालन करणे अपेक्षित आहे. बांधकामावरील मजुरांना कामावर बोलवितांना त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था संबंधित बांधकाम व्यावसायिकाने केली पाहिजे अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यांचे लसीकरण करण्याला प्राधान्य देण्याचे देखील सुचविण्यात आलेले आहे.
--कोट--
आता चलता है, चालणार नाही
सोमवारी रात्रीपासून निर्बंध अधिक कठोर होणार असून आता ‘चलता हैे’ असे म्हणून चालणार नाही. यापुढे दंडात्मक कारवाई आणि निर्बंध अंमलबजावणीसाठी कठोर पावले उचलली जाणार आहेत. त्यामुळे सर्व र्यत्रणेला कारवाईच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत. निर्बंधाबाबतचा पुढील निर्णय नागरिकांच्या प्रतिसादावर अवलंबून असणार आहे. - छगन भुजबळ, पालकमंत्री.