त्र्यंबकेश्वर : येत्या शनिवारी (दि.६) ते सोमवार (दि.९) दरम्यान त्र्यंबकेश्वर शहरातुन बाहेरगावी महत्वाच्या कामासाठी जायचे असल्यास अगर बाहेर गावावरुन शहरात यायचे असल्यास पोलिसांना कामाचे स्वरुप, आधारकार्ड वगैरे प्रक्रिया पुर्ण झाल्याशिवा य शहरात अगर शहराबाहेर सोडता येणार नाही. असे प्रांताधिकारी यांनी सुचना दिल्या आहेत.या बंदोबस्ताकरीता जव्हार फाट्यावर बॅरीकेटींग टाकण्यात येणार आहे. हा निर्णय मंगळवारी (दि.२) झालेल्या सहा. जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी यांच्या बैठकीत घेतला आहे. दि.७ रोजी संत निवृत्तीनाथ महाराज यात्रा असल्याने गर्दी होऊ नये म्हणुन कोव्हीडच्या पार्श्वभूमीवर खबरदारी करीता हा निर्णय घेण्यात आला आहे. तथापि यापुर्वी उपविभागीय तथा प्रांताधिकारी यांच्या आदेशाने फक्त निवृत्तीनाथ समाधी मंदीर परिसरात गर्दी होऊ नये म्हणुन संचारबंदी जारी केली आहे.मात्र मंगळवारी याच अधिक-यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत संचारबंदी थेट जव्हारफाटा परिसरात असल्याचे म्हटले आहे. या निर्णयाने लोकांमध्ये संदिग्धता तसेच संभ्रमावस्था निर्माण होत आहे.
त्र्यंबकेश्वरला तीन दिवस कडक बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 17:27 IST
त्र्यंबकेश्वर : येत्या शनिवारी (दि.६) ते सोमवार (दि.९) दरम्यान त्र्यंबकेश्वर शहरातुन बाहेरगावी महत्वाच्या कामासाठी जायचे असल्यास अगर बाहेर गावावरुन शहरात यायचे असल्यास पोलिसांना कामाचे स्वरुप, आधारकार्ड वगैरे प्रक्रिया पुर्ण झाल्याशिवा य शहरात अगर शहराबाहेर सोडता येणार नाही. असे प्रांताधिकारी यांनी सुचना दिल्या आहेत.
त्र्यंबकेश्वरला तीन दिवस कडक बंदोबस्त
ठळक मुद्देनिवृत्तीनाथ समाधी मंदीर परिसरात संचारबंदी जारी