दिंडोरी : शहरात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढू नये म्हणून प्रशासनाने शनिवार व रविवार बाजारपेठ बंद करण्याच्या निर्णयास व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला असून रविवार आठवडे बाजार सोबतच संपूर्ण बाजारपेठ बंद असल्याने दिंडोरी शहरातील लाखोंची उलाढाल ठप्प होत सर्वत्र शुकशुकाट होता.नगरपंचायत प्रशासनाने जनजागृती करत शनिवार व रविवार बाजारपेठ बंद राहील याबाबत दवंडी देण्यात आली होती, त्यास व्यापाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत दुकाने बंद ठेवले. शनिवारी भाजीपाला फळ बाजार सुरू होता. मात्र रविवारी हा बाजारही बंद ठेवण्यात आला. त्यामुळे नेहमी गजबजलेल्या बाजार पटांगणात शुकशुकाट होता.व्यापारी अडचणीतगेल्या लॉक डाऊनमध्ये मोठे आर्थिक नुकसान झालेला व्यापारी वर्ग कुठे सावरत असताना पुन्हा लॉक डाऊन आठवड्यातील दोन दिवस व सायंकाळी ७ नंतर बाजारपेठ बंद करावी लागत असल्याने व्यापारी अडचणीत सापडले आहे. आठवडे बाजार बंद झाल्याने या बाजारातील व्यापाऱ्यांचेही मोठे नुकसान होत आहे.
दिंडोरी शहरात कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 9:22 PM