शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून आज भारत बंदमध्ये दुकाने जरी उघडी असली तरी ग्राहकांनी आज पाठ फिरविल्याने शहरातील आर्थिक व्यवहार चांगलेच ठप्प झाले. मालेगाव शहरातील दुकाने आज नेहमीप्रमाणे उघडली; मात्र ग्रामीण भागातील ग्राहक आज शहरात फिरकलाच नाही. त्यामुळे बाजारपेठेत व रस्त्यांवर नेहमीची वर्दळ दिसून आली नाही. ग्रामीण भागातील ग्रामस्थांनी आज आपआपल्या गावीच राहणे पसंत करून एक प्रकारे शेतकरी आंदोलनाला पाठिंबाच दिला असल्याचे जाणवले. शहरी भागातील नागरिकांनीही बंदमुळे बाहेर पडणे टाळले. परिणामी बाजारपेठेसह बॅंका, शासकीय कार्यालये, दवाखाने आदी ठिकाणी नेहमीची वर्दळ दिसून आली नाही. त्याचा परिणाम रिक्शा वाहतूक, हाॅटेल व्यावसायिक व इतर बाजार पेठेवर दिसून आली. गेले ४ महिने लॉकडाऊनमुळे सर्वत्र बंदच होता. त्यामुळे आता पुन्हा बंदमध्ये सहभागी होणे परवडणारे नाही, अशी प्रतिक्रिया व्यापारी वर्गाकडून मिळाली. त्यातच सध्या लग्न सराईचा हंगाम असल्याने बाजारपेठेला ग्राहकांची प्रतीक्षा आहे.
मालेगाव शहरातील कृषी केंद्रे, शेती अवजारे व शेती साहित्य विक्री करणारे दुकाने आज पूर्णपणे बंद होती. राष्ट्र सेवा दलाचे शेतकरी आंदोलनास व भारत बंदला पाठिंबा दिला आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे निवेदन
मालेगाव शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे शेतकऱ्यांच्या भारत बंदला पाठिंबा देण्यात आला असून, याबाबत अपर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर सलीम रिझवी, शाबान तांबोळी, रफीक मुर्गावाला, वहाब खान यांच्या सह्या आहेत. तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे अपर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. शेतकऱ्यांवर अन्याय करणारे कायदे शासनाने रद्द करावे, अशी मागणी करण्यात आली. निवेदनावर तालुकाध्यक्ष संदीप पवार, डॉ. जयंत पवार, विजय पवार, किशोर इंगळे, बाळासाहेब बागूल, प्रशांत पवार, धनंजय पाटील, स्वप्निल भदाणे आदींच्या सह्या आहेत.
फोटो फाईल नेम : ०८ एमडीईसी ०१ . जेपीजी
फोटो फाईल नेम : ०८ एमडीईसी ०३ . जेपीजी
फोटो कॅप्शन : मालेगाव तालुक्यातील रावळगाव येथे शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा दर्शविण्यासाठी पाळण्यात आलेला बंद.
मालेगाव बार असोसिएशन
मालेगाव वकील संघातर्फे अपर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. केंद्र शासनाने आणलेले नवे कृषी विधेयक जाचक असून ते रद्द करावे, अशी मागणी करण्यात आली. निवेदनावर बार असोसिएशनचे अध्यक्ष आर. के. बच्छाव, उपाध्यक्ष मलीक शेख, सचिव किशोर त्रिभुवन यांच्या सह्या आहेत.
फोटो फाईल नेम : ०८ एमडीईसी ०४ . जेपीजी
फोटो कॅप्शन : मालेगावी तालुका वकील संघातर्फे शेतकऱ्यांच्या भारत बंदला पाठिंबा दर्शविताना तालुकाध्यक्ष आर. के. बच्छाव, उपाध्यक्ष मलीक शेख, सचिव किशोर त्रिभुवन आदींसह वकील.
मालेगाव तालुका शिवसेना
मालेगाव तालुका शिवसेनेतर्फे शेतकऱ्यांच्या देशव्यापी बंदला पाठिंबा दर्शविण्यात आला असून याबाबत अपर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. केंद्र शासनाने शेतकरी विरोधी कायदे रद्द करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. निवेदनावर उपजिल्हा प्रमुख प्रमोद शुक्ला, तालुका प्रमुख संजय दुसाने, शहर प्रमुख रामा मिस्तरी, उपमहापौर नीलेश आहेर, मनोहर बच्छाव, जिल्हा संघटक संगीता चव्हाण, छाया शेवाळे, अरुणा चौधरी, राजेश गंगावणे, भीमा भडांगे आदींच्या सह्या आहेत.
फोटो फाईल नेम : ०८ एमडीईसी ०५ . जेपीजी
फोटो कॅप्शन : मालेगाव तालुका शिवसेनेतर्फे अपर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना संजय दुसाने, नीलेश आहेर, रामा मिस्तरी, मनोहर बच्छाव, संगीता चव्हाण आदी.
===Photopath===
081220\08nsk_42_08122020_13.jpg
===Caption===
मालेगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे अपर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना तालुकाध्यक्ष संदीप पवार. समवेत बाळासाहेब बागूुल, राजेंद्र पवार, विजय पवार आदि.