शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपच्या पहिल्या यादीत बहुतेक जुन्याच चेहऱ्यांना संधी; फडणवीस यांच्यासह सर्व १० मंत्री मैदानात
2
तीन आमदारांचे टेन्शन वाढले; मुंबईत नार्वेकर, लोढा, शेलार यांचा अपेक्षेप्रमाणे पहिल्या यादीत समावेश
3
नालासोपाऱ्यातून भाजपाच्या राजन नाईक यांना उमेदवारी; क्षितिज ठाकूर यांचे आव्हान
4
भाजपच्या ठाणे जिल्हा यादीत प्रस्थापितांवरच पसंतीची मोहोर! तर्कवितर्कांना पूर्णविराम, उमेदवारी जाहीर
5
विधानसभेसाठी भाजपाकडून महामुंबईत विद्यमान २३ आमदार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार!
6
महाविकास आघाडी तुटण्याच्या दिशेने?; भास्कर जाधव कडाडले, काँग्रेसला करून दिली आठवण
7
जम्मू काश्मीरात दहशतवादी हल्ला; गांदरबल इथं गोळीबारात ३ मजूर ठार तर ५ जखमी
8
समाजवादी गणराज्य पक्ष काँग्रेसमध्ये विलीन; कपिल पाटील यांचा दिल्लीत पक्षप्रवेश
9
नाशिकमध्ये सीमा हिरेंच्या उमेदवारीला पक्षातच विरोध; महायुतीत बंडखोरीची शक्यता
10
"आमच्यात वाद नव्हताच..."; उमेदवारी न मिळालेल्या भाजपा आमदार अश्विनी जगपात यांचं विधान
11
१५ बैठका, ३४० तास चर्चा तरीही जागावाटप सुटेना; 'मातोश्री'तील बैठकीत काय घडलं?
12
पक्षफुटीनंतरही एकनिष्ठ राहिलेल्या आमदाराचा शरद पवारच करणार 'करेक्ट कार्यक्रम'?
13
कुटुंबवादामुळे तरुणांचे नुकसान; 1 लाख तरुणांना राजकारणात आणणार, PM मोदींची घोषणा
14
Video - मोबाईलवर बोलत रेल्वे ट्रॅक ओलांडत होता 'तो'; अचानक समोरून आली ट्रेन अन्...
15
कडक सॅल्यूट! पतीचा मृत्यू झाला पण 'तिने' हार नाही मानली; ई-रिक्षा चालवून भरतेय कुटुंबाचं पोट
16
दारुण पराभवानंतर BCCI चा मोठा निर्णय; उर्वरीत मालिकेसाठी स्टार खेळाडूला मिळाली संधी
17
नात्याला काळीमा! नातवाने त्रिशूळाने वार करून केली आजीची हत्या, शिवलिंगावर रक्ताचा अभिषेक
18
मुंबईतल्या 'या' १४ जागांवर भाजपाचे उमेदवार ठरले; ३ विद्यमान आमदार प्रतिक्षेत 
19
ज्योती मेटे यांचा शरद पवार गटात प्रवेश, विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत म्हणाल्या...
20
महिलेशी मैत्री, हॉटेलमध्ये भेटायला बोलावलं अन्...; कसा पकडला गेला शार्प शूटर सुक्खा?

‘बेमोसमी’चा दुसऱ्या दिवशीही तडाखा

By admin | Published: November 22, 2015 11:42 PM

ढगाळ वातावरण : दुपारनंतर जोरदार हजेरी; शहरात वाढला गारठा

नाशिक : आग्नेय व पूर्वमध्य अरबी समुद्रावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे झालेल्या बेमोसमी पावसाने शहरात रविवारी दुसऱ्या दिवशीही जोरदार हजेरी लावली. शनिवारी ५.२ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. दोन दिवसांपासून शहरात ढगाळ वातावरण कायम असून, त्यामुळे किमान तपमानात वाढ झाली. दरम्यान, काल रविवार असूनही पावसामुळे नागरिकांनी घराबाहेर न पडणेच पसंत केले. गेल्या काही दिवसांपासून थंडीत हळूहळू वाढ होत होती. शुक्रवारी तर शहराचे किमान तपमान राज्यात नीचांकी ११.५ अंश सेल्सिअसवर पोहोचले होते; मात्र शनिवारपासून अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाले आणि सायंकाळी सात वाजेच्या सुमारास धुव्वाधार पावसाने तडाखा दिला. शहराच्या सर्व भागांत सुमारे दीड तास पाऊस सुरू होता. पेठ रोड येथील हवामान केंद्रात शनिवारी ५.२ मि. मी. पावसाची नोंद झाली. काल रविवार सकाळपासूनच ढगाळ वातावरण कायम होते. दुपारी तीन वाजेनंतर शहराच्या काही भागांत पावसाच्या सरी कोसळल्या. यामुळे रस्त्यावरील विक्रेत्यांचे चांगलेच हाल झाले. शहराच्या सखल भागांत तसेच रस्त्यांवर पावसाचे पाणी साचले होते. त्यामुळे रविवार असूनही कालबाजारपेठेत शुकशुकाट दिसून येत होता. शनिवारचा अनुभव लक्षात घेऊन नागरिक रेनकोट, छत्र्या घेऊनच घराबाहेर पडत होते. दरम्यान, पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण तसेच पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. नाशिकच्या धरणांतून मराठवाड्यातील जायकवाडी धरणाला पाणी दिल्याने नाशिककरांपुढे पाणीकपातीचे संकट उभे ठाकल्याचे बोलले जाते. त्यामुळे या बेमोसमी पावसाने तरी दिलासा मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)तपमान २० अंशांवर

ढगाळ वातावरणामुळे शहराच्या किमान तपमानात वाढ झाली आहे. शुक्रवारी ११.५ अंशांपर्यंत घसरलेले तपमान शनिवारी १६.४ अंशांवर पोहोचले, तर रविवारी पहाटे ते २०.२ इतके नोंदवण्यात आले. पावसामुळे तात्पुरता गारवा निर्माण झाला असला, तरी ढगाळ वातावरणामुळे तपमान वाढल्याचे हवामान खात्याच्या वतीने सांगण्यात आले.