नाशिक : सर्व शिक्षा अभियानामार्फत राबविण्यात येणाऱ्या हंगामी वसतिगृह योजनेत पारदर्शकता असावी आणि गरजू विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ व्हावा यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने सुरगाणा तालुक्यात एकाचवेळी ५९ वसतिगृहांची धडक तपासणी मोहीम राबविण्यात आली. यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष पथकांनी अचानक वसतिगृहांवर धडक दिल्याने संबंधितांची चांगलीच धावपळ झाली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी सुरगाणा तालुक्यात यापूर्वी कार्यरत असणाºया ५९ वसतिगृहांची ५९ पथकांद्वारे तपासणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शनिवारी एकाचवेळी सुरगाणा तालुक्यातील ५९ गावातील यापूर्वी कार्यरत वसतिगृहांची अतिशय गोपनीय पद्धतीने तपासणी केली. जिल्ह्यात अशाप्रकारे एकाचवेळी तपासणी करण्याची ही पहिलीच वेळ असून यामुळे सदरच्या योजनेबाबची वास्तव परिस्थिती समोर येणार आहे. सर्वशिक्षा अभियानांतर्गत ६ ते १४ वयोगटातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन गेल्या ५ वर्षांपासून निवासी हंगामी वसतिगृह योजना राबवत आहे. ग्रामीण भागातील गरीब कुटुंब अर्थात शेतमजूर, ऊसतोड कामगार, वीट भट्टीवरील कामगार, अनुसूचित जाती, जमाती, दारिद्र्य रेषेखालील कुटुंब आदींच्या मुलांसाठी राज्य शासनाने हंगामी निवासी वसतिगृहे सुरू केली आहेत. गेल्या पाच वर्षांपासून सदर योजना सुरू आहे. मात्र या योजनेचा लाभ खरोखरीच गरजूंना देण्यात येतो का?, विद्यार्थ्यांना शासन निकषानुसार व मापदंडानुसार आहार पुरवला जातो का? विद्यार्थी संख्या किती आहे? या बाबींविषयी पडताळणी करण्यासाठी सदरची तपासणी करण्यात येत आहे. यासाठी सामान्य प्रशासन विभाग व प्राथमिक शिक्षण विभागाच्या समन्वयाने ५९ पथक तयार करून त्यामध्ये पशुधन विकास अधिकारी, पर्यवेक्षक, सहायक लेखाधिकारी, कनिष्ठ लेखाधिकारी, विस्तार अधिकारी शिक्षण यांचे पथक तयार करण्यात आले. यासाठी वाहनाची व्यवस्था करून सकाळी ६.३० वाजता सदर पथक एकाचवेळी सुरगाणा तालुक्यात पाठविण्यात आले. त्यांनी अचानक तपासणी करून काही उणीवा त्यांच्या निदर्शनास आल्याचे समजते.
धडक कारवाई : जिल्ह्यात प्रथमच विशेष पथकाद्वारे एकाच वेळी पाहणी ५९ वसतिगृहांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2018 1:13 AM
नाशिक : सर्व शिक्षा अभियानामार्फत राबविण्यात येणाऱ्या हंगामी वसतिगृह योजनेत पारदर्शकता असावी आणि गरजू विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ व्हावा यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने सुरगाणा तालुक्यात एकाचवेळी ५९ वसतिगृहांची धडक तपासणी मोहीम राबविण्यात आली.
ठळक मुद्दे५९ पथकांद्वारे तपासणी करण्याचा निर्णयगेल्या ५ वर्षांपासून निवासी हंगामी वसतिगृह योजना