संस्था परिचयसन १९३५ मध्ये दहा-बारा महिलांनी एकत्र येऊन स्त्री मंडळाची स्थापना केली. या छोट्याशा रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. मंडळाचा नुकताच ८५वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. इ.स. १९३६ मध्ये मंडळाची नियमावली तयार करण्यात आली. ज्या काळात महिला हळदीकुंकू व सांस्कृतिक कार्यक्रम याशिवाय बाहेर पडत नसत त्या काळात महिलांना एकत्र करून या मंडळामार्फत त्यांना बॅटमिंटनचा हॉल उपलब्ध करून देण्यात आला. स्त्रियांचा वैयक्तिक विकास, सामाजिक प्रबोधनात्मक कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम स्त्री मंडळाच्या वतीने घेतले जातात. आजही शिशू क्रीडांगण, बॅटमिंटन हॉल असे क्रीडा संकुल सुुरू आहे. गेल्या साडेआठ दशकांपासून स्त्रियांनी यशस्वीपणे चालविलेली महिला संस्था अशी स्त्री मंडळाची ओळख आहे. सर्व क्षेत्रातील स्त्रियांचा सर्वांगीण उत्कर्ष हाच या मंडळाचा हेतू आहे. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांनी या मंडळाला ‘स्त्रीशक्ती हीच शिवक्ती’असे ब्रीदवाक्य प्रदान केले.या संस्थेच्या अध्यक्षा जयश्री काशीकर असून, सचिव स्मिता वैशंपायन आहेत. तर कार्यकारिणीत अल्का कुकडे, सुजता दीक्षित, नीलांबरी जोशी, स्वाती राजेबहादूर, राधिका कहांडोळे, दीपाली गायधनी, वृषाली रत्नपारखी आदींचा समावेश आहे. स्त्री मंडळातर्फे तिडके कॉलनी येथे मंडळाच्या सभागृहात आनंदमेळा, गाण्याचा कार्यक्रम, एकपात्री प्रयोग, नृत्य स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा घेण्यात येतात.
स्त्रीशक्ती जागृतीसाठी प्रयत्नशील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2019 12:29 AM