सटाणा : हवामान खात्याने निसर्ग चक्रीवादळाचा इशारा दिल्यानंतर सटाणा शहरासह तालुक्यात बुधवारी (दि.३) सकाळपासूनच पावसाने दमदार हजेरी लावली आहे. सर्वत्र पाण्याचे डबके साचले आहेत. या पावसामुळे कांदा आणि उन्हाळ बाजरी भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.मंगळवारी (दि.२) सायंकाळी शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी धुव्वाधार पाऊस कोसळला. बुधवारी (दि.३) सकाळ पासूनच पावसाने सुरु वात केली. सकाळी साडेनऊच्या सुमारास तब्बल एक तास मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यानंतर रिपरिप सुरु होती. पुन्हा दुपारी एक व सव्वा दोन वाजता अर्ध्या-अर्ध्या तासांनी पावसाचा जोर वाढल्याने ठिकठिकाणी पावसाचे डबके साचले होते तर पाठक मैदानावर पाणी साचल्याने तळे निर्माण झाले होते. शहरासह ग्रामीण भागात या मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावल्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मात्र चांगलाच दिलासा मिळाला.चक्रीवादळाच्या पाशर््वभूमीवर तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. त्यानंतर शहरासह तालुक्यात दवंडी पिटवण्यात येत आहे. दरम्यान चक्रीवादळामुळे जनजीवन विस्कळीत होऊन नये म्हणून प्रशासनाला सज्ज राहण्याच्या सूचना आमदार दिलीप बोरसे यांनी प्रांताधिकारी विजयकुमार भांगरे, तहसीलदार इंगळे पाटील यांना दिल्या आहेत. त्यानंतर इंगळे पाटील यांनी तत्काळ सार्वजनिक बांधकाम विभाग, वीज महावितरण कंपनी, बागलाणचे गटविकास अधिकारी पांडुरंग कोल्हे आदी खाते प्रमुखांची बैठक घेतली.या बैठकीत चक्रीवादळामुळे नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर जोरदार वारे, अतिवृष्टी, गारपीट होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. या परिस्थितीत तातडीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या.---------------------------नियंत्रण कक्षाची तयारीआपत्तीकाळात आरोग्य व्यवस्था सुसज्ज ठेवावी, प्रत्येक कार्यालयात नियंत्रण कक्ष तयार करून आवश्यक माहिती तहसील कार्यालयातील नियंत्रण कक्षास तातडीने देणेची व्यवस्था करावी, चक्र ीवादळ व त्याअनुषंगाने उद्भवणाºया परिस्थितीसाठी आवश्यक नियोजन व पूर्वतयारी करावी व कोणत्याही परिस्थितीत जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात. कायदा व सुव्यवस्था राखणेसाठी आवश्यक नियोजन करावे व अफवा पसरणार नाहीत यासाठी उपाययोजना कराव्यात आदी सूचना तहसीलदारांनी अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिल्या.
सटाण्यात दमदार हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2020 9:06 PM