पंचवटी : नाशिक महानगरपालिकेने मिळकत करात केलेल्या दरवाढीच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेना पंचवटी विभागाच्या वतीने शनिवारी (दि.२४) पंचवटी कारंजा येथे तीव्र निदर्शने करु न घरपट्टी देयकांची होळी करण्यात आली.सत्ताधारी भाजपने दत्तक घेतलेल्या नाशिककवर घरपट्टीच्या दरात ३३ ते ८२ टक्के पर्यंत केलेली दरवाढ सर्वसामान्य नाशिककरांचे कंबरडे मोडणारे असल्याने नाशिककरांमध्ये तीव्र भावना उमटल्या आहेत. करवाढीच्या विरोधात मनसेनेही आंदोलन छेडले आहे. यावेळी पंचवटी कारंजा येथे सत्ताधारी भाजपाच्या विरोधात घोषणा देत निषेध नोंदविण्यात आला. संतप्त मनसैनिकांनी घरपट्टी देयकांची होळी करून लवकरात लवकर ही करवाढ मागे घ्यावी, अन्यथा यापुढे मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.यावेळी महाराष्ट्र नविनर्माण सेना प्रदेश उपाध्यक्ष राहुल ढिकले, मनसे शहराध्यक्ष अनिल मटाले, पंचवटी विभाग अनंता सुर्यवंशी, मनविसे प्रदेश उपाध्यक्ष संदिप भवर, मनविसे जिल्हाध्यक्ष दीपक चव्हाण, खंडु बोडके, सागर जाधव, हरिष गुप्ता, जालिंदर शिंदे, राहुल राजपुरोहित, गणेश मंडलिक, प्रविण भाटे, सागर बैरागी, सागर माळी, विलास जोशी, स्विप्नल ओढाने, सौरभ सोनवणे, मिलिंद गोसावी, सागर रामटेके, मोनिष पारेख, सुमित शेलार, राहुल ससाणे, भास्कर लोणारे, अरु ण हारकळ, चेतन चांदवडकर, शुभम ढिकले, मनिष थेटे, महिला पदाधिकारी पुजा धुमाळ, अरु णा पाटील, धनश्री, छाया नाडे, कामिनी दोंदे सह सर्व पदाधिकारी व सहकारी, नागरिक उपस्थित होते.
नाशकात करवाढीविरोधी मनसेची जोरदार निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 5:27 PM
घरपट्टी देयकांची होळी : भाजपा विरोधी घोषणाबाजी
ठळक मुद्देघरपट्टीच्या दरात ३३ ते ८२ टक्के पर्यंत केलेली दरवाढ सर्वसामान्य नाशिककरांचे कंबरडे मोडणारे असल्याने नाशिककरांमध्ये तीव्र भावनापंचवटी कारंजा येथे सत्ताधारी भाजपाच्या विरोधात घोषणा