शहरं
Join us  
Trending Stories
1
CM म्हणून शिंदेंना मोठी पसंती, उद्धव ठाकरेंना किती मते; फडणवीस-राज ठाकरेंना किती टक्के कौल?
2
“नाना पटोलेंनी मुख्यमंत्री होणार असे कुठेही म्हटले नाही”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
3
Exit Poll: दोन्ही NCP तुल्यबल; एकनाथ शिंदेच ठरणार वरचढ, उद्धव ठाकरेंना किती जागा मिळणार?
4
१०७ जागांसह भाजपा सर्वांत मोठा पक्ष, महाविकास आघाडीला १०२ जागा; नवीन Exit Pollचा अंदाज
5
अदानी समूहाला आणखी एक झटका; अडचणीत असताना मोठा आंतरराष्ट्रीय करार रद्द
6
महायुती की मविआ, कुणाला मिळणार 'सिंहासन'? विभागनिहाय कुणाचं पारडं ठरणार जड? असा आहे लेटेस्ट 'Exit Poll'!
7
"दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या व्यवस्था अन् संस्था कोलमडत आहेत"; गयानाच्या संसदेत काय बोलले PM मोदी?
8
मनोज जरांगेंची ऐनवेळी निवडणुकीतून माघार; ४८ टक्के मराठा समाजाने महायुतीला दिली पसंती
9
Exit Poll: २०१९ मध्ये एकमेव खरा ठरलेला एक्झिट पोल आला; महायुती-मविआच्या मतांत १० टक्क्यांचे अंतर...
10
“गुलाल आम्ही उधळणार, महायुतीची सत्ता ५ वर्ष टिकणार, एकनाथ शिंदेच CM होणार”: संतोष बांगर
11
मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण; हायकोर्टाकडून आरोपीला जामीन
12
“अमित शाह यांनी CM भाजपाचा असेल असे कधी म्हटले नाही”; महायुतीतील नेत्याचे सूचक विधान
13
‘लाडकी बहीण’ योजनेचा फायदा महायुतीला मिळेल का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महिलांनी मतदान...”
14
“अदानींविरोधात अमेरिकेत काढलेले अटक वॉरंट म्हणजे देशासाठी शरमेची गोष्ट”: संजय राऊत
15
“लाच देऊन कंत्राटे मिळवल्याचे स्पष्ट, भ्रष्ट गौतम अदानींना अटक का करत नाही?”: नाना पटोले
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना अटक होणार? इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टानं जारी केलं 'अरेस्ट वॉरंट'
17
"सरकार तर स्थापन होऊ द्या"; मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवरुन काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने नाना पटोलेंना झापलं
18
IND vs AUS: ना विराट, ना रोहित, ना बुमराह; ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 'हा' खेळाडू ठरेल 'हिरो'- पुजारा
19
गुगलला क्रोम ब्राऊझर विकावा लागण्याची शक्यता; अमेरिकन सरकार दबाव टाकणार
20
IND vs AUS: "विराट म्हणजे क्रिकेटचा सुपरस्टार"; ऑस्ट्रेलियन खेळाडूची पत्नी 'किंग कोहली'वर फिदा

गावित विरोधकांचे कॉँग्रेसला बळ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2019 12:09 AM

नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात इगतपुरी मतदारसंघात कॉँग्रेस, शिवसेनेसह मनसे, वंचित आघाडी हे राजकीय पक्ष उतरले असले तरी, कॉँग्रेस आणि शिवसेना असा पारंपरिक सामना पुन्हा एकदा रंगणार हे निश्चित झाले आहे. मात्र, माजी आमदार निर्मला गावित यांच्या शिवसेना प्रवेशानंतर निर्माण झालेल्या विरोधाचा धुराळा बसल्याचे गावित समर्थकांकडून सांगितले जात असले तरी, पक्षांतर्गत विरोधकांकडून कॉँग्रेसच्या उमेदवाराला अप्रत्यक्षरीत्या बळ पुरविले जाण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देशिवसेना-भाजपतील इच्छुकांमध्ये विरोधाचा ज्वालामुखी भडकला.इगतपुरी-त्र्यंबकमध्ये यंदा बदलाची मानसिकता

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात इगतपुरी मतदारसंघात कॉँग्रेस, शिवसेनेसह मनसे, वंचित आघाडी हे राजकीय पक्ष उतरले असले तरी, कॉँग्रेस आणि शिवसेना असा पारंपरिक सामना पुन्हा एकदा रंगणार हे निश्चित झाले आहे. मात्र, माजी आमदार निर्मला गावित यांच्या शिवसेना प्रवेशानंतर निर्माण झालेल्या विरोधाचा धुराळा बसल्याचे गावित समर्थकांकडून सांगितले जात असले तरी, पक्षांतर्गत विरोधकांकडून कॉँग्रेसच्या उमेदवाराला अप्रत्यक्षरीत्या बळ पुरविले जाण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.मतदारसंघाचा कानोसा घेतला असता, दोन टर्म मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या निर्मला गावित यांनी हॅट्िट्रक साधण्यासाठी पक्षच बदलला असला तरी मतदारांमध्ये मात्र यंदाचा आमदारच बदलण्याची मानसिकता दिसून येत आहे. कॉँग्रेसकडून मतदारसंघाचे दोनदा नेतृत्व करणाºया निर्मला गावित यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हाती शिवबंधन बांधल्यानंतर मतदारसंघात शिवसेना-भाजपतील इच्छुकांमध्ये विरोधाचा ज्वालामुखी भडकला.शिवसेनेने गावित यांना उमेदवारी दिल्यास सर्वपक्षीय एकच उमेदवार देण्याचाही निर्णय झाला. दरम्यान, अपेक्षेप्रमाणे सेनेने गावित यांना उमेदवारी दिली आणि राष्टÑवादीच्या हिरामण खोसकर यांनीही पक्षांतर करीत कॉँग्रेसकडून उमेदवारी मिळविली.गावित यांचा अर्ज भरताना माजी आमदार शिवराम झोले यांनी हजेरी लावली, तर माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांनी अनामत भरली; पण अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे गावित विरोधकांनी आपली तलवार म्यान केल्याचे एकीकडे सांगितले जात असले तरी, अप्रत्यक्षरीत्या विरोधकांकडून कॉँग्रेसच्या उमेदवाराला बळ पुरविले जाण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे गावित यांची डोकेदुखी वाढणार आहे. गावित यांच्यावर उपसा जलसिंचन योजनेत १०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. याशिवाय, दोन टर्म प्रतिनिधित्व करूनही मतदार संघातील पिण्याच्या पाण्यासह मूलभूत सुविधांबाबत दुर्लक्ष झाल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न ‘जैसे थे’ आहेत. दुर्गम भागात अद्यापही आरोग्य सेवा पोहोचलेल्या नाहीत, तर आहे त्या सुविधांचा बोजवारा उडालेला आहे. इगतपुरी-त्र्यंबकेश्वर या दोन्ही तालुक्यांत बेरोजगारीचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. त्याबाबतही विद्यमान आमदारांनी ठोस कृती केली नसल्याचा सूर विरोधकांकडून ऐकायला मिळत आहे. गावित या नाशिकमध्येच जास्त वास्तव्यास असल्याने यंदा नाशिकचे पार्सल परत पाठविण्याची तयारी केली असल्याची संतप्त प्रतिक्रियाही ऐकायला मिळाली. प्रांतवादाचा मुद्दा ऐरणीवर निर्मला गावित या नाशिकच्या असल्याने भूमिपुत्रांना न्याय देण्याची भूमिकाही मतदारांमध्ये अधिक बळावल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे प्रत्यक्ष प्रचारात प्रांतवादाचा मुद्दा ऐरणीवर येण्याची शक्यता बोलून दाखविली जात आहे. मतदारसंघ युतीच्या जागावाटपात भाजपला न सुटल्याने भाजपमधील इच्छुकांमध्ये नाराजीची भावना दूर झालेली नाही. याशिवाय, सेनेतील इच्छुकांना शांत केल्याचे सांगितले जात असले तरी, सेना-भाजपतील नाराज गटाकडून अप्रत्यक्षरीत्या कॉँग्रेसला बळ पुरविले जाण्याची चर्चा आहे. कळीचे मुद्देसर्वाधिक धरणांचा तालुका असूनही पिण्याच्या पाण्यासाठी महिलावर्गाला करावी लागणारी वणवण.इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघात प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांची तीव्रता अधिक आहे. त्यामुळे हा घटकही नाराज आहे.उपसा जलसिंचन योजनेतील गैरव्यवहारा- तील आरोपांमुळे मतदारांमध्ये संशयाचे मळभ दाटलेले आहे. न केलेल्या कामांचे श्रेय घेण्यामुळेही वाढता रोष आहे.

टॅग्स :igatpuri-acइगतपुरीMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019