बाजारपेठेत सोयीने दुकाने उघडी
नाशिक : कोरोनामुळे बाजारपेठेतील दुकानांवर निर्बंध लावण्यात आलेले असले तरी दुकानदार सोयीने दुकाने सुरू ठेवत असल्याने प्रशासनाच्या नियमाला हरताळ फासला जात आहे. दुकानदार नियमांकडे दुर्लक्ष करून शटर अर्धवट उघडे ठेवून व्यवसाय करीत असल्याचे चित्र सर्वत्र बघायला मिळत आहे.
फेरीवाल्यांनी व्यापला रस्ता
नाशिक : जेलरोड येथील सैलानी बाबा चौकात फळविक्रेत्यांनी रस्ता व्यापल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. या चौकात सातत्याने वर्दळ असल्याने अनेकदा वाहनांची कोंडी होते. या चौकातील फळविक्रेत्यांना हटवून त्यांना इतरत्र स्थलांतरित करावे अशी मागणी येथील व्यावसायिकांनी देखील केली आहे.
ऊन्हामुळे रूग्ण संख्येत वाढ
नाशिक: वाढत्या ऊन्हामुळे विषाणूजन्य आजारात वाढ झाली असल्याने फॅमिली फिजिशियन डॉक्टरांकडे रूग्णांची गर्दी वाढली आहे. लहान मुलांना सर्दी, खोकला आणि तापाच्या तक्रारी समोय येत आहेत. कोरेानाच्या भितीमुळे रूग्ण अधिक काळजी घेत असल्याने फॅमिली डॉक्टरांकडील गर्दी वाढली असल्याचे दिसते.
घरपोच आहार पुरविण्याची सुविधा
नाशिक: निर्बंधामुळे दुकाने बंद झाली आहेत तर वाढत्या करोनासंक्रमणामुळे नागरिकही घराबाहेर पडण्याचे टाळत असल्याने काही संस्थांनी घरपोच आहार तसेच भाजीपाला पुरविण्याची सेवा सुरू केली आहे. ज्या घरांमध्ये वयस्क राहातात त्यांच्यासाठी ही सुविधा लाभदायक ठरत आहे. कोरोनारूग्णांसाठीचा पौषि्टक आहार देखील काहीजण पुरवित आहेत.
टाकळी-जेलरोड लिंक चौक धोक्याची
नाशिक: टाकळीकडून जेलरोडकडे जाणाऱ्या लिंकरोडवर दुभाजक टाकण्यात आल्यानंतरही हा चौक धोकादायक बनला आहे. एका बाजूने रस्ता मोठा तर दुसऱ्या बाजूने लहान रस्ता असल्याने जेलरोडकडून येणाऱ्या वाहनधारकाला चौकात अपघात होण्याची शक्यता आहे. या रस्तयाने येणाऱ्या वळणावरचा रस्ता वाढविण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.