ब्राह्मणगाव : येथे रविवारी सायंकाळी सहा वाजेपासून मेघ गर्जनेसह दमदार पावसाने हजेरी लावल्याने कापणीला आलेल्या बाजरी पिका सह लागवडी साठी तयार असलेल्या कांदा रोपांचे ही नुकसान झाले आहे.या पावसाळ्यात परिसरात पावसाने जोरात हजेरी लावली मात्र ब्राह्मणगाव, लखमापूर, धांद्री, शेमली, यशवंतनगर हा परिसर सतत पावसाअभावी वंचित राहिला होता. मात्र परतीच्या पावसाने गेल्या दोन दिवसापासून संध्याकाळी दमदार हजेरी लावल्याने विहिरींना पाणी उतरून पुढील रब्बी हंगामसाठी याचा फायदा होणार आहे.मात्र हा परिसर कांदा लागवड मोठ्या प्रमाणात करत असल्याने शेतकरी आता कांदा रोपांचे तयारी करत असताना या पावसाने कांदा रोपांचे नुकसान होत असून कांदा लागवड पुन्हा लांबणार आहे.सद्या खरीप हंगाम सुरू असून बाजरी सर्वत्र कापणीला आली आहे. मका पीक या वर्षी घटणार असून लष्करी आळी मका पिकावर आक्र मण केल्याने मका उत्पादन घटणार आहे. येवढे असले तरी वातावरणात अजुन उष्मा असून, परतीचा पाऊस किती धिंगाणा घालतो या चिंतेत शेतकरी बांधव पडले आहे.
परतीच्या पावसाची दमदार हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2019 8:54 PM
ब्राह्मणगाव : येथे रविवारी सायंकाळी सहा वाजेपासून मेघ गर्जनेसह दमदार पावसाने हजेरी लावल्याने कापणीला आलेल्या बाजरी पिका सह लागवडी साठी तयार असलेल्या कांदा रोपांचे ही नुकसान झाले आहे.
ठळक मुद्देब्राह्मणगाव : लोकांची पळापळ ; कांदा रोपे, पिकांचे मोठे नुकसान