पेठ : रक्तदाब, मधुमेह सारख्या अनेक शारिरीक व्याधींनी ग्रस्त असूनही पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या पेठ येथील एका 77 वर्षीय आजीबाईने कोरोनावर मात केली असून शहरातील 11 पैकी 9 रु ग्णांनी कोरोनापासून मुक्ती मिळवत घरवापसी केली आहे.पेठ शहरातपहिला कोरोना रूग्ण आढळल्यापासून प्रशासन व जनता यांच्या योग्य समन्वयाने तत्काळ आवश्यक उपाययोजना करूनही संपर्क साखळी मुळे रु ग्णसंख्या 11 वर पोहचली. त्यात दोघांचा बळीही गेला. मात्र त्यानंतर नगरपंचायत, पोलीस, आरोग्य, महसूल यंत्रणा व व्यापारी संघटनांनी तत्काळ उपाययोजना करून योग्य वेळी शहर लॉकडाऊन करून कोरोनाची साखळी खंडित करण्यात यश मिळवले. शहरातील व्याधीग्रस्त 77 वर्षीय वृध्द महिलेस लागण झाल्याने कुटूंबातील समस्यांची चिंता वाढली असताना आजीबाईने मात्र मानिसक हिंमत दाखवून कोरोनावर मात केली. यामुळे नागरिकांची कोरोना बाबतची भीती कमी होण्यास मदत झाली. पेठ शहरातील व्यवहार हळूहळू पूर्वपदावर येत असले तरी नागरिक व व्यावसायिक यांनी शासनाचे नियम पाळून योग्य खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
संघर्ष : तालुक्यातील 9 कोरोनामुक्त रूग्णांची घरवापसी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2020 6:40 PM
पेठ : रक्तदाब, मधुमेह सारख्या अनेक शारिरीक व्याधींनी ग्रस्त असूनही पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या पेठ येथील एका 77 वर्षीय आजीबाईने कोरोनावर मात केली असून शहरातील 11 पैकी 9 रु ग्णांनी कोरोनापासून मुक्ती मिळवत घरवापसी केली आहे.
ठळक मुद्देपेठच्या 77 वर्षीय आजीबाईने कोरानाला हरवले