सुदर्शन सारडा, ओझर : दुष्काळाची धग अधिक तीव्र बनत असतानाच द्राक्ष पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यातील उत्तर भागात द्राक्षबागा वाचविण्यासाठी बागायतदारांची धडपड सुरू आहे. त्यासाठी विकतचे पाणी घेऊन द्राक्ष बागा जिंवत ठेवण्याचे प्रयत्न होताना दिसून येत आहे.निफाड तालुक्यातील उत्तर भागात पाणी टंचाई तीव्र बनली आहे. याच भागातील रानवड,नांदुर्डी,सावरगाव व आजूबाजूच्या लहान गावातील शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे.त्यातच पालखेड कालव्याला पाणी सुरू झाले.मनमाड व येवल्यासाठी आरक्षित पाण्यात आमचे बंधारे भरून द्या अशी मागणी उगाव,शिवडी, वनसगाव भागातील शेतक-यांनी केली आहे. त्यामुळे पाऊस वेळेवर न पडल्यास पाणी संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहे. बेमोसमी पावसाची अपेक्षा फोल ठरल्यानंतर जून महिना सुरू झाला आहे. हवामान खात्याने पावसाची तारीख ८ जून नंतर सांगितली आहे, अशा परिस्थितीत द्राक्ष हंगाम आटोपल्यानंतर पुढील हंगामासाठी द्राक्ष उत्पादकांना सध्या द्राक्षबागांना पाणी विकत देण्याची वेळ आली आहे. निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात अग्रेसर निफाड तालुक्यात विहिरींनी तळ गाठला आहे. तालुक्यातील उगांव ,वनसगांव ,शिवडी ,खेडे ,सोनेवाडी,शिवरे,दावचवाडी, खडकमाळेगांव ,खानगांव ,सारोळे परिसरात विहिरीसह बोअरवेल कोरडेठाक झाले आहेत. शेतीच्या पाण्याबरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. येत्या खरिपाच्या हंगामासाठी शेत नांगरु न तयारी झाली आहे. आता पावसाची प्रतीक्षा केली जात आहे.दुहेरी संकटया वर्षी पाण्याची कमतरता असल्याने द्राक्षबागांवर कु-हाड चालवण्याची वेळ आली आहे. शेतकरी अस्मानी आणि सुलतानी अशा दुहेरी संकटात सापडला आहे. द्राक्षबागा वाचवण्यासाठी तीन ते साडेतीन हजार रु पये प्रतिटँकरने पाणी खरेदी करायची वेळ आली आहे.- सुनील जेउघाले, द्राक्ष उत्पादक,उगाव खेडे
द्राक्षबागा जगविण्यासाठी धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2019 6:25 PM
शेतकरी चिंताक्रांत : निफाडच्या उत्तरभागात तीव्र पाणीटंचाई
ठळक मुद्देशेतीच्या पाण्याबरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे