पेठ : एकीकडे कोरोनाचे संकट थैमान घालत असतांना राज्यातील विनाअनुदानित शाळेत सेवा करणाऱ्या शिक्षकांची मात्र अनुदानाच्या मागणीसाठी परवड सुरू असून राज्यातील विनाअनुदान शिक्षक कृती समिती मागील महिन्यापासून आमदार खासदारांसह मंत्री महोदयांचे उंबरठे झिजवीत आहेत.राज्यातील कायम विनाअनुदान तत्वावर सुरू करण्यात आलेल्या हजारो शाळांमधील शिक्षकांनी गत १५ ते २० वर्षापासून विना वेतन सेवा करत अखेरीस शासनाकडे कायम शब्द काढून प्रचलित पध्दतीने अनुदान देण्यासाठी सुरू केलेल्या संघर्षाला काही अंशी यश आले. शासनाने कायम शब्द काढून मुल्याकनानंतर पात्र शाळांना २० टक्के अनुदानही दिले. यापुढील टप्प्यात पून्हा २०/२० टक्के वाढीव अनुदान न देता प्रचलित पध्दतीनुसार शाळा व शिक्षकांना १०० टक्के अनुदान द्यावे या मागणीसाठी राज्यभर मंत्री महोदयांच्या भेटी घेऊन गाºहाणे मांडले जात आहे. नाशिक जिल्हा विनाअनुदानित शाळा शिक्षक कृती समितीच्या वतीने आमदार डॉ. सुधीर तांबे, पालकमंत्री छगन भूजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झरिवाळ, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन मंत्रीमंडळाच्या बैठकीत अनुदानाचा प्रश्न निकाली काढावा अशी मागणी करण्यात आली.याप्रसंगी विनाअनुदानित शाळा कृती समितीचे राज्य सहसचिव गोरख कुळधर, विभागीय कार्याध्यक्ष कांतीलाल नेरे, जिल्हा अध्यक्ष भारत भामरे, मनोज वाकचौरे, सोमनाथ जगदाळे, शिवाजी खुळे, घोडेराव, वाबळे आदी उपस्थित होते.
विनाअनुदानित शाळातील शिक्षकांचा कोरोनात ही संघर्ष सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 10:03 PM
पेठ : एकीकडे कोरोनाचे संकट थैमान घालत असतांना राज्यातील विनाअनुदानित शाळेत सेवा करणाऱ्या शिक्षकांची मात्र अनुदानाच्या मागणीसाठी परवड सुरू असून राज्यातील विनाअनुदान शिक्षक कृती समिती मागील महिन्यापासून आमदार खासदारांसह मंत्री महोदयांचे उंबरठे झिजवीत आहेत.
ठळक मुद्दे मंत्रीमंडळाच्या बैठकीत अनुदानाचा प्रश्न निकाली काढावा अशी मागणी