नाशिक : सातव्या वेतन आयोगानुसार वेतनवाढ मिळावी व अन्य विविध मागण्यांसाठी शुक्रवारपासून एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने जिल्ह्यातील बससेवा विस्कळीत झाली आहे. शनिवारीही संप कायम राहिल्याने बससेवा खंडित होऊन शेकडो प्रवाशांना इच्छितस्थळी जाण्यासाठी पायपीट करावी लागली. खासगी वाहतुकदारांनी दुप्पट भाडे आकारले.
लासलगावी कामबंद आंदोलनलासलगाव : राज्यातील एसटी कर्मचाºयांनी सुरू केलेल्या कामबंद आंदोलनात लासलगाव आगारातील १०० टक्के कर्मचारी सहभागी झाल्याने बाहेरगावी जाण्यासाठी जाणाºया प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. शुक्र वारी व शनिवारी एकही बस बाहेर न गेल्याने विद्यार्थीवर्गाला दहावीचा निकाल पाहण्यासाठी बाहेर गावातून येथे येण्यासाठी मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. या बंदमुळे प्रवाशांचेही मोठे हाल होत आहेत. नाशिक जिल्ह्यातही एस.टी. संपाला पाठिंबा देण्यात आला आहे. एसटीची वाहतूक आज पूर्णपणे थांबविण्यात आली. त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. लासलगाव बस आगार प्रमुख पद्मने यांनी याबाबत माहिती दिली. पगारवाढीवरून राज्यातील एसटी कर्मचाºयांनी आक्र मक भूमिका घेत संप घोषित केला आहे. आगारातून ५३ बसेस १६ हजार किमी धावत असतात. परिसरातील ४०हून अधिक गावातील नागरिक या बसस्थानकात प्रवासाकरिता येत असतात. संपाचा प्रभाव पाहायला मिळत असून, गजबजलेल्या राहणाºया बसस्थानकावर शुकशुकाट दिसत आहे.
सिन्नरला संपाला संमिश्र प्रतिसादसिन्नर : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाºयांनी विविध मागण्यांसाठी अघोषित संप पुकारल्याने एस.टी. सेवेचे वेळापत्रक दुसºया दिवशीही विस्कळीत झाल्याचे दिसून आले. सिन्नर आगाराच्या संपाच्या पहिल्या दिवशी ७६ फेºया रद्द झाल्या होत्या, तर दुसºया दिवशी दुपारपर्यंत ७४ फेºया रद्द झाल्या. संपाला मात्र संमिश्र प्रतिसाद लाभला. शुक्रवारी मध्यरात्री अचानकपणे कर्मचारी संपावर गेल्याने शनिवारी प्रवाशांना याची कल्पना नव्हती. त्यामुळे सकाळी नेहमीप्रमाणे बसस्थानकावर आलेल्या प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागला. सिन्नर आगाराच्या लांब पल्ल्याच्या व मध्यम पल्ल्याच्या अनेक बस बंद होत्या, तर ग्रामीण भागात सुरळीत बसवाहतूक सुरू होती. ग्रामीण भागात सुमारे ९० टक्के बससेवा सुरू होती. मात्र लांब व मध्यम पल्ल्याच्या बस बंद असल्याने प्रवाशांना खासगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागल्याचे चित्र होते. ज्या बस सुरू होत्या, त्यांना प्रवाशांची प्रचंड गर्दी दिसून येत होती. सिन्नर आगारातील सुमारे ७५ टक्के बस सुरू होत्या, अशी माहिती आगारप्रमुख भूषण सूर्यवंशी यांनी दिली. सिन्नर आगाराच्या शुक्रवारी सायंकाळपर्यंत २८५ फेºया झाल्या, तर ७६ फेºया रद्द झाल्या होत्या. आगारातील सुमारे २५ ते ३० कर्मचारी अघोषित संपात असल्याचे सांगण्यात येत होते. या संपाला संमिश्र प्रतिसाद लाभल्याचे चित्र होते. काळी-पिवळी व खासगी वाहतुकीची चलती असल्याचे दिसून आले.
खासगी वाहनांकडून दुप्पट भाडेदेवळा : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाºयांनी संप पुकारल्यामुळे प्रवाशांना त्याचा मोठा फटका बसत असून, एसटी भाड्यापेक्षा दुप्पट पैसे मोजून खासगी वाहनाने प्रवास करण्याची वेळ आली आहे. यामुळे प्रवाशांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. एसटी कर्मचाºयांच्या संपामुळे प्रवासी मात्र हवालदिल झाले आहेत. संपकाळात सटाणा आगाराच्या बसने सटाणा ते नाशिक अशी फेरी मारून प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.नुकतेच दहावी व बारावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले असून, आपल्या पाल्याच्या पुढील शिक्षणासाठी पालकांना नाशिक, पुणा, मुंबई आदी शहरांतील अभियांत्रिकी, वैद्यकीय आदी महाविद्यालयांना प्रत्यक्ष भेट देऊन माहिती घेण्यासाठी जावे लागणार आहे. सधन पालक स्वत:चे खासगी वाहन घेऊन जातील; परंतु गरिबांना मात्र एस.टी. बसच परवडणारी असल्यामुळे या पालकांची बसच्या संपामुळे कुचंबणा होत आहे. एसटीचा प्रवास आर्थिकदृष्ट्या सर्वांनाच सोईस्कर ठरतो. एसटी कर्मचाºयांनी पुकारलेल्या संपामुळे एसटी सेवा बंद असल्याने खासगी वाहनांचा आधार घेण्याशिवाय प्रवाशांना दुसरा पर्याय नाही. यामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. लवकरच शाळा, महाविद्यालये सुरू होतील, त्यावेळी गावाकडे सुटीसाठी आलेल्या व बाहेरगावी शिक्षणासाठी जाणाºया विद्यार्थीवर्गाला संपाचा फटका बसणार आहे. यामुळे संप लवकर मिटण्याची प्रतीक्षा सर्वांना आहे.
मालेगाव आगाराच्या २०७ फेºया रद्द
मालेगावला एसटी कर्मचाºयांनी पुकारलेल्या संपाचा फटका सलग दुसºया दिवशी प्रवाशांना बसला आहे. येथील आगाराच्या २०७ फेºया रद्द झाल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले, तर खासगी वाहनधारकांकडून अव्वाच्यासव्वा भाडे आकारणी केली जात आहे. गेल्या दोन दिवसात आगाराचे सुमारे नऊ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. वेतनवाढ फसवी असल्याचा आरोप करीत एस.टी. कर्मचाºयांनी शुक्रवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. एस.टी. कर्मचारी संघटना व शासनामध्ये तडजोड न झाल्यामुळे शनिवारी दुसºया दिवशीही संप कायम करण्यात आला. या संपाचा येथील मालेगाव आगाराला फटका बसला आहे. मालेगाव आगाराचे २०० कर्मचारी संपात सहभागी झाल्यामुळे एस.टी.ची चाके थांबली आहेत. शनिवारी दिवसभरात केवळ १८ मार्गांवर बसफेºया झाल्या, तर २०७ बसफेºया कर्मचाºयांअभावी रद्द करण्यात आल्या आहेत. गेल्या दोन दिवसात आगाराचे नऊ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या संपाचा प्रवाशांना फटका बसला आहे. खासगी वाहनधारकांकडून वाढीव भाडे आकारले जात आहे.