शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
2
वसंतराव देशमुखांच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर आठ तास आंदोलन; जयश्री थोरातांवर गुन्हा दाखल
3
अमित ठाकरेंना भाजपकडून समर्थन; सदा सरवणकर कार्यकर्त्यांना म्हणाले, "वाटेल त्या परिस्थितीत..."
4
काँग्रेसचा उमेदवार जाहीर होताच कोल्हापुरात राडा, कार्यालयावर दगडफेक, भिंतीवर लिहिलं चव्हाण पॅटर्न
5
लाेकशाही, न्यायासाठी लढणे हाच माझ्या जीवनाचा पाया : प्रियांका गांधी
6
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
7
तीन सख्खे भाऊ दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात; नंदुरबारातून विजयकुमार, शहाद्यातून राजेंद्रकुमार, नवापुरातून शरद गावित 
8
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर उत्तर मधून महायुतीतर्फे राजेश क्षीरसागर निश्चित
9
इस्राइलने मोडले इराणच्या बॅलेस्टिक मिसाईल प्रोग्रॅमचे कंबरडे, अचूक हल्ल्यात प्लँट नष्ट
10
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
11
Vidya Balan: 'भूल भुलैय्या 2' साठी विद्या बालनने का दिला होता नकार? स्वत:च केला खुलासा
12
आम्ही काँग्रेसला सोडले नाही; त्यांनीच आम्हाला सोडले! अशोकराव पाटील-निलंगेकर बंडाच्या तयारीत?
13
आजचे राशीभविष्य : एखाद्याशी मतभिन्नता होण्यास आपला अहंभाव कारणीभूत ठरेल, अचानक धनखर्च होईल
14
भाजपचे ८८ आमदार रिंगणात, दुसऱ्या यादीमध्येही नेत्यांच्या नातेवाईकांचा समावेश, ९ आमदारांना तिकीट
15
थोरात समर्थकांचा ८ तास ठिय्या; वसंत देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा, महिला आयोगाकडून दखल
16
माहीममध्ये अमित ठाकरेंना महायुतीकडून पाठिंबा? भाजप मदतीसाठी धावला; मुख्यमंत्री शिंदेंच्या निर्णयाकडे लक्ष
17
नितेश राणेंविरुद्ध पारकर, राठोडांसमोर जयस्वाल; उद्धवसेनेच्या यादीत अनिल गोटेंसह १८ जण
18
"मी 'त्या' मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती, तरीही...", सचिन सावंतांची पक्षश्रेष्ठींकडे विनंती! 
19
महासत्ताधीश कोण? कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात होणार चुरस
20
‘मोठा भाऊ’ होण्यासाठी शिंदेसेना-भाजपत शह-काटशह; ठाणे जिल्ह्यातील १८ जागांवर रस्सीखेच

एसटीची लालपरी आता मालवाहतुकीला बरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 9:37 PM

नांदगाव : यापुढे परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवाशांच्या ऐवजी सामानाचे खोके, पोती व इतर लगेज दिसले तर आश्चर्य वाटायला नको. प्रवासी वाहतूक करताना तोट्यात चाललेल्या महामंडळाने आता मालवाहतुकीचा व्यवसाय सुरू केला असून, सकृतदर्शनी बसची ही सेवा खासगी वाहतूकदारांच्या भाड्यापुढे स्वस्त असल्याने नाशिक ते नांदगाव रासायनिक खतांच्या पाच बसेस येऊन दाखल झाल्या आहेत.

नांदगाव : यापुढे परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवाशांच्या ऐवजी सामानाचे खोके, पोती व इतर लगेज दिसले तर आश्चर्य वाटायला नको. प्रवासी वाहतूक करताना तोट्यात चाललेल्या महामंडळाने आता मालवाहतुकीचा व्यवसाय सुरू केला असून, सकृतदर्शनी बसची ही सेवा खासगी वाहतूकदारांच्या भाड्यापुढे स्वस्त असल्याने नाशिक ते नांदगाव रासायनिक खतांच्या पाच बसेस येऊन दाखल झाल्या आहेत.लॉकडाऊनमुळे नांदगाव व मनमाड येथे रेल्वे मालधक्क्यावर रासायनिक खतांचे रॅक येत नसल्यामुळे नाशिक येथून खतांची वाहतूक करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस उपलब्ध करून देण्यात आल्या. त्यामुळे रासायनिक खत विक्रे त्यांना लागणाऱ्या अतिरिक्त वाहतूक भाड्याची बचत झाली असल्याचे तालुक्याचे आमदार सुहास कांदे यांनी सांगितले.पावसाळा सुरू झाल्याने शेतकऱ्यांच्या पेरणीची लगबग सुरू आहे. अशा परिस्थितीत रासायनिक खतांची चढ्या दराने विक्र ी होण्याची शक्यता निर्माण होऊन शेतकºयांना आर्थिक नुकसान सोसावे लागणार होते. याबाबत नांदगाव येथील रासायनिक खते विके्रत्यांकडून मालवाहतुकीसाठी बस उपलब्ध करून देण्याची मागणी स्थानिक आमदार सुहास कांदे यांच्याकडे करण्यात आली होती. त्याप्रमाणे बुधवारी नांदगाव येथे परिवहन महामंडळाच्या बसमधून खते आणण्यात आली. योग्य वाहतूक भाड्यामध्ये खतांची वाहतूक होऊन नांदगावमध्ये बहुतेक खत विक्रेत्यांकडे रासायनिक खते उपलब्ध झालेली आहेत. बस बंद असल्याने महामंडळाचे आर्थिक नुकसान होत असून, खतांची वाहतुक करून महामंडळाच्या उत्पन्नात भर पडणार आहे.-------------------------३५ रुपये प्रतिकिमी भाडेनाशिक ते नांदगाव प्रत्येक बसचे भाडे सुमारे ४००० रु पये. या रकमेत प्रत्येकाला आठ टन रासायनिक खते मिळाली. खासगी वाहतुकीने आठ टन वजनाच्या वाहतुकीसाठी सुमारे ५००० रु पये खर्च येतो. ३५ रु . किमी प्रमाणे भाडे आकारले जाते.----------------------१०० किमीच्या अंतरासाठी ३५ रु . प्रतिकिमीप्रमाणे एकेरी भाडे आकारण्यात येईल. एका बसमध्ये आठ टन माल जाऊ शकतो. १०० पेक्षा कमी अंतर असेल तरी ३५०० रु पयेच भाडे असणार आहे. मागणीप्रमाणे बस उपलब्ध आहेत. यामुळे आगाराच्या उत्पन्नात भर पडण्यास मदत होणार आहे.- विश्वास गावित, आगारप्रमुख

टॅग्स :Nashikनाशिक