नाशिक : निफाड कृषी अधिकारी कार्यालयातील लाचखोर अनुरेखकास ५ हजार ७०० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी (दि. १८) रंगेहाथ पकडून अटक केली. या प्रकरणी ठिबक सिंचन साहित्य विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या तक्रारदाराने केलेल्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करीत संशयिताला सापळा रचून अटक केली आहे.निफाड तालुका कृषी कार्यालयातील वसंत लक्ष्मण ढिकले या अनुरेखकाने ठिबक सिंचन योजनेतील प्रस्तावांची सबसिडी मंजूर करण्याच्या मोबदल्यात व्यावसायिकाकडून पाच हजार ७०० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. निफाड तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनची मागणी करीत त्याचा प्रस्ताव तालुका कृषी कार्यालयाकडे सादर केला आहे. शेतकऱ्यांचे प्रस्ताव मंजूर होत नसल्याने ठिबक सिंचनपुरवठा करणाºया व्यावसायिकाने संशयित ढिकले याची भेट घेतली असता, त्यांच्याकडे पाच हजार ७०० रुपयांची लाच मागितली होती.शिवाजी चौकात कारवाईव्यावसायिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्याने पथकाने सोमवारी पडताळणी करून ही कारवाई केली. नगरपंचायत निफाड कार्यालय परिसरातील शिवाजी चौकात संशयिताने बोलाविले असता, त्यास लाचेची रक्कम घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.
अनुरेखकास लाच स्वीकारताना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 1:52 AM