नाशिक : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देत मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यक र्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलनासाठी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनासाठी जागाच नसल्याने आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने मोर्चा वळवला. मात्र यावेळी उपोषणाच्या जागेवरून प्रशासन आणि आंदोलकांमध्ये वादंग झाल्याने आंदोलकांनी न्यायालयाच्या प्रवेशद्वारावरच ठिय्या आंदोलन केले. आंदोलकांना रोखल्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. परंतु, पोलिसांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून काही वेळासाठी न्यायालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ उपोषणास परवानगी दिली. आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाच्या दुसºया टप्प्यात गुरुवार (दि. २६) पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास सुरुवात करण्यात आली. मात्र आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी जागेअभावी परवानगी नाकारली. त्यामुळे आंदोलनकर्त्यांना जिल्हा न्यायालयाच्या प्रवेशद्वारासमोरच रोखत आंदोलनासाठी परवानगी नसल्याचे सांगितले. पोलिसांच्या या विधानानंतर कार्यकर्त्यांनी थेट न्यायालयाच्या प्रवेशद्वारासमोरच ठिय्या आंदोलन करीत घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे काहीवेळ तणाव निर्माण झाला होता. शुक्रवारपासून ईदगाह मैदानावर उपोषण करण्याचा सल्ला यावेळी देण्यात आला. मात्र आंदोलनकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळील जागेसाठी ठाम राहत तेथेच आंदोलन सुरू केले. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक करण गायकर, राजू देसले, तुषार जगताप, अर्जुन खर्जुल, पूजा धुमाळ, डॉ. अनुपमा मराठे, चारुशिला देशमुख, मंगला शिंदे, वैशाली डुंबरे, संगीता खालकर, अस्मिता देशमाने, रोहिणी दळवी, शोभा सोनवणे, अनुपमा पाटील, मनोरमा पाटील, माधवी पाटील यांच्यासह मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक व कार्यकर्ते उपस्थित होते.अखेर परवानगीप्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरुळे यांनी आंदोलनस्थळी येत पदाधिकाºयांशी चर्चा केली. उपोषणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या परिसरात जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. मात्र स्मार्ट सिटीअंतर्गत रस्त्याचे काम सुरू असल्याने तसेच परिसरात शाळा, महाविद्यालये असल्याने उपोषणकर्त्यांना या जागेवर परवानगी नाकारत आंदोलकांची कोंडी करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. त्यानंतर जिल्हाधिकाºयांनी एक दिवसासाठी शिवाजी स्टेडियम परिसरात उपोषण करण्यास परवानगी दिली.
जिल्हा न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 11:44 PM
नाशिक : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देत मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यक र्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलनासाठी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनासाठी जागाच नसल्याने आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने मोर्चा वळवला. मात्र यावेळी उपोषणाच्या जागेवरून प्रशासन आणि आंदोलकांमध्ये वादंग झाल्याने आंदोलकांनी न्यायालयाच्या प्रवेशद्वारावरच ठिय्या आंदोलन केले. आंदोलकांना रोखल्यामुळे काही ...
ठळक मुद्दे परवानगी नाकारल्याने मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमकआंदोलकांना रोखले :