शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
2
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
3
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
4
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
5
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
6
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
7
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
8
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
9
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
10
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु
11
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
12
Leela Palace IPO: पैशांची व्यवस्था करून ठेवा! आता दिग्गज हॉटेल ब्रँडचाही येणार IPO; पाहा डिटेल्स
13
"पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचा मृत्यू झाला असता तर आरोपीला ३० मिनिटांत जामीन दिला असता का?"
14
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
15
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
16
IND vs BAN : शुबमन गिलची कमाल! शतकी खेळीसह द्रविड-कोहलीसह रुट-बाबरला धोबी पछाड!
17
पॅसेन्जरच्या जेवणात निघाला जिवंत उंदीर, कराव लागलं विमानाचं इमरजन्सी लॅन्डिंग; नेमकं काय घडलं?
18
पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!
19
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत
20
३ महिन्यांपासून थंडावलेले डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक्स; आता जोरदार तेजी; एकात लागलं अपर सर्किट

संतप्त नातेवाइकांचा पोलीस ठाण्यात ठिय्यां

By admin | Published: September 26, 2015 11:30 PM

ज्येष्ठ नागरिकावर हल्ला : २५ दिवस उलटूनही हल्लेखोरांचा तपास नाही

जायखेडा : पहाटे फिरायला गेलेले येथील जेष्ट नागरीक दगा ठाकरे यांच्यावर जिवघेणा हल्ला करणाऱ्या गुन्हेगारांचा छडा लावण्यात २२ ते २५ दिवस उलटुनही जायखेडा पोलीसांना अपयश येत असल्याच्या निषेधार्थ संतप्त नातेवाईक व कुटुंबियांनी जायखेडा पोलीस ठाण्यात एक ते दिड तास ठिय्या देवून पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र होळकर यांना घेराव घातला. यावेळी पोलीसांच्या ढिसाळ कारभारा विषयी संताप व्यक्त करीत गुन्हेगारांचा त्वरीत शोध लावावा अशी मागणी करण्यात आली.जायखेडा- ता. बागलाण येथील दगा तुळशीराम ठाकरे नेहमी प्रमाणे जायखेडा सोमपुर रस्त्यावर पहाटे पाच साडेपाचच्या दरम्यान फिरायला गेले होते, काही वेळात ते गंभीर जखमी अवस्थेत रस्तेकडेला बेशुद्ध पडलेले आढळुन आले, त्यांच्या पाटीवर व डोक्यावर धारदार शस्राने वार केल्यासारख्या खुना दिसत होत्या तर उजवा हात कोपराजवळ मुडलेला होता, यावेळी प्रथम दर्शनी हा अपघात असावा असा अंदाज पोलीसांनी व्यक्त केला होता. मात्र त्यांच्या कुंटूबीयांनी घातपाताचा संशय व्यक्त करून, त्यांची कन्या जयश्री कळंबकर यांनी जायखेडा पोलीसात फिर्याद दिली असुन अज्ञातव्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी दगा ठाकरे यांच्यावर. प्रथम नासिक येथील व नंतर मुंबई येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. माञ दुर्दैवाने काल त्यांचे उपच्यारादरम्यान निधन झाले. त्यांच्यावर जायखेडा येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यानंतर लगेचच सर्वांनी पोलीस ठाण्यात आपला मोर्चा वळून पोलीसांना तपासात होत असलेल्या दिरंगाइ बद्दल जाब विचारला. या आधी ही गुन्हेगारांना लवकरात लवकर शोधावे अशी मागणी नातेवाईकांनी निवेदनाद्वारे केली होती.मात्र तपासात कुठलीच प्रगती न आढळल्याने उपस्थितांनी तिव्र नाराजी व्यक्त केली. आमचा तपास चालु आहे तुम्ही आम्हाला सहकार्य करा असे नेहमीचे उत्तर यावेळी पोलीसांनी उपस्थितांना दिले.