दिंडोरी : महाराष्ट्र राज्य विद्यार्थी विकास संघटनेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष नितीन बोढारे यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांचा मोर्चा दिंडोरी तहसिल कार्यालयावर काढण्यात आला. यावेळी नायब तहसिलदार धनंजय लचके याना निवेदन देण्यात आले.यावेळी आदिवासी वसतिगृहात विजेचा अनेक दिवसापासून चाललेला लपंडाव बंद करावा ही प्रमुख मागणी करण्यात आली.आदिवासी वसतिगृहासाठी विज दिंडोरीतून उपलब्ध व्हायला हवी ती मात्र ग्रामीण भागातून दिली जात असल्यामुळे रात्री वसतिगृहात विज उपलब्ध नसते. ऐन परीक्षेच्या काळात विज उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांवर नापास होण्याची वेळ आली आहे. वसतिगृहातील विद्यार्थ्यांना वेळेवर आहार मिळावा, दिंडोरी येथे अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी बाहेर गावातून येत असतात. त्यांना बस चालक वाहक अतिशय निकृष्ट वागणूक देत असतात. विद्यार्थ्यांना बसमध्ये प्रवेश नाकारला अथवा थांब्यावर बस थांबवली नाही तर त्यांच्यावर कारवाई करावी. अन्यथा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानाला शासनच जबाबदार राहील, आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी विद्यार्थी विकास संघटनेचे अध्यक्ष नितीन बोढारे, योगेश राऊत, मोहन वाघेरे, निकेतन जाधव, शशी शार्दूल, रवी गायकवाड, लखन कराटे, प्रसाद टर्ले, तानाजी झनकर, गोकुळ शिंदे, गोकुळ बोरस्ते, भूषण पवार, विकी शिंदे, निखिल अनवट, धनंजय उगले, गिरीष वाघ, शेखर रेहरे, अतुल डंबाळे, कांचन नाठे, मोनिका सोळशे, साक्षी केदार, प्रियंका पवार, सानिया नायकवाडी आदी उपस्थित होते.
विद्यार्थी विकास संघटनेचा दिंडोरी तहसिलवर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2019 6:02 PM
मागण्यांचे निवेदन : वसतिगृहातील तक्रारी
ठळक मुद्देनायब तहसिलदार धनंजय लचके याना निवेदन देण्यात आले.