पाथरे : कुमावत बेलदार समाज सेवा संघाच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला.नाशिकमधील कामटवाडा भागातील माउली लॉन्स येथे कुमावत बेलदार समाज सेवा संघाचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी समाजातील दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जिल्हाध्यक्ष कैलास कुंडलवाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास व्यासपीठावर श्रीकांत परदेशी, वसंत मुंडावरे, राहुल कुमावत, सटाणा तालुका अध्यक्ष संजय बागोरे, डॉ. शरद बगडाने, रामदास छल्लारे, योगेश देवतवाल, नांदगाव तालुका अध्यक्ष राकेश बागोरे, जिल्हा उपाध्यक्ष शांताराम कुमावत, यशोदा कुंडलवाल, उषा कुमावत, रत्ना देवतवाल, संजीवनी कुमावत, मानसी कुमावत, विजया कुमावत, सीमा कुंडलवाल, सविता कुमावत आदी मान्यवर उपस्थित होते.डॉ. भाटीवाळ यांचे चिरंजीव आशुतोष भाटीवाळ यांचे अपघाती निधन झाले. त्यांना आणि इतर दिवंगत समाज बांधवांना सेवा संघाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. जिल्हाध्यक्ष कैलास कुंडलवाल यांनी समाजाला मार्गदर्शक ठरेल असे कार्य करणे गरजेचे असल्याचे सांगितले.यावेळी इयत्ता दहावी आणि बारावीतील १६० गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. वह्या, घड्याळ, गुलाबपुष्प व सन्मानपत्र देऊन विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. जिल्हा सचिव प्रदीप कुमावत यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हा उपाध्यक्ष योगेश देवतवाल यांनी आभार मानले. यावेळी विद्यार्थी, पालक व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.समाजातील गरजू, हुशार विद्यार्थ्यांना मदत केली पाहिजे. समाजाने संघटित राहून बदलत्या काळानुसार बदल घडवून आणला पाहिजे. यापुढे समाजातील गरजूंना कुमावत संघ मदत करेल आणि गुणगौरवही करेल.- कैलास कुंडलवाल, जिल्हाध्य, कुमावत बेलदार समाज सेवा संघ
कुमावत बेलदार समाज संघाकडून विद्यार्थी गुणगौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2018 12:44 AM
पाथरे : कुमावत बेलदार समाज सेवा संघाच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला. नाशिकमधील कामटवाडा भागातील माउली लॉन्स येथे कुमावत बेलदार समाज सेवा संघाचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न झाला.
ठळक मुद्देगुणगौरव सोहळा उत्साहात