लोकमत न्यूज नेटवर्कसटाणा : वाणिज्य शाखेच्या शेवटच्या वर्षात असलेल्या चिलू गोरख मोरे (२०) याने नापास झाल्याने निराश होत ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी नांदिन येथे घडली.नाशिक येथे के.के. वाघ महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या दुसऱ्या वर्षात शिकत असलेल्या (बी.कॉम.) चिलू मोरे याचा बुधवारी (दि. १४) आॅनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर आपण नापास झाल्याचे त्याला समजले आणि आता घरच्यांना काय सांगावे या विवंचनेत चिलूने विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. आपल्या मुलाचा आज निकाल होता मात्र निकाल पाहून घरी आल्यावर तो कोणाशीही न बोलता दुपारी घरातून निघून गेला आणि त्याचा मोबाइलही बंद येत असल्याने त्याच्या वडिलांनी त्याची शोधाशोध सुरू केली. वडील गोरख मोरे यांनी जवळच्या मित्रांना याबाबत सांगितल्याने त्यातील एकाने सहज म्हणून ग्रामपंचायतीची विहीर डोकावून पाहिले तर विहिरीत चप्पल आणि गळ्यातली माळ तरंगत असल्याचे आढळून आले.तब्बल नऊ तास चालली शोधमोहीमडॉ. नवलसिंग सूर्यवंशी यांनी विहिरीत उडी घेत चिलू मोरे याच्या मृतदेहाची शोधाशोध केली. त्यापाठोपाठ सुभाष नंदन, संदीप पिंपळसे, शंकर बागुल, नामदेव देवरे या युवकांनी विहिरीत उतरून शोधमोहीम सुरू केली. मात्र विहिरीत २० फूट पाणी असल्याने शोधकार्यात अडथळे येत होते. लोडशेडिंग असल्याने अखेर जनरेटरची व्यवस्था करण्यात आली. दोन तासांनी पाण्याची पातळी घटल्याने पुन्हा शोधमोहीम सुरू झाली. अखेर मध्यरात्री ३ वाजता चिलूचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
नांदीन येथे विद्यार्थ्याची आत्महत्त्या
By admin | Published: June 16, 2017 12:12 AM