सायखेडा : आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने निफाड तालुक्यातील ३७२ शाळेतील १४६५५ विद्यार्थी, २५०२ शिक्षक आणि ४३७१ पालकांनी आपल्या घरी, तसेच कार्यालयाच्या आवारातच योगासने केली.शैक्षणिक वर्ष सुरू झाले असले तरी शाळा बंद आणि शिक्षण सुरू आहे. शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थी घरीच अध्यापन करतात, योग दिनाचे औचित्य साधून घरी योगा करावा, असे आवाहन गटशिक्षणाधिकारी केशव तुंगार यांनी केले होते. शिक्षकांनी जनजागृती करून विद्यार्थी आणि पालक यांनी घरी योगा करावा अशा सूचना दिल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर निफाड तालुक्यातील विद्यार्थी, पालक, शिक्षक यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.२१ जूनचे महत्त्व...२१ जून हा जगातील बहुतेक देशात मोठा दिवस असतो. या दिवशी सूर्य लवकर उगवतो आणि सायंकाळी जास्त वेळ उजेड देतो. आध्यामिक व सांस्कृतिक कारण बघता योगामुळे शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकासाची कल्पना स्पष्ट होते. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भाव काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी होमिओपॅथी औषधांबरोबर व्यायाम व योगा यावरही भर दिला गेला. योगामुळे शरीर व मन सशक्त होते. या दिनाच्या निमित्ताने योगाचे महत्त्व घराघरांत मुलांमार्फत पोहोचले आहे.
निफाडमधील ३७२ शाळेतील विद्यार्थ्यांनी केला घरीच योगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 00:12 IST
सायखेडा : आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने निफाड तालुक्यातील ३७२ शाळेतील १४६५५ विद्यार्थी, २५०२ शिक्षक आणि ४३७१ पालकांनी आपल्या घरी, तसेच कार्यालयाच्या आवारातच योगासने केली.
निफाडमधील ३७२ शाळेतील विद्यार्थ्यांनी केला घरीच योगा
ठळक मुद्दे२५०२ शिक्षकांसह ४३७१ पालकांचाही समावेश