नाशिक : वडळागावातील शाळाक्रमांक ८३ येथे विनापरवानगी सुरू असलेल्या नववीचा वर्ग बंद करण्याच्या सूचना शिक्षणाधिकारी देवीदास महाजन यांनी केल्यानंतर या वर्गात बसणाया विद्यार्थ्यांनी मंगळवारी (दि.९०) भर पावसात रस्त्यावर उतरून आम्ही शिकायचे कसे, असा सवाल करीत महापालिका आयुक्तांना भेटण्याचाा आग्रह धरला. मात्र आयुक्तांच्या अनुपस्थितीत उपायुक्त महेशकुमार डोईफोडे यांनी विद्यार्थ्यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घेत शिक्षणाधिकारी महाजन यांच्याशी समन्वयातून या प्रश्नावर तोडगा काढण्याचा सल्ला दिला. दरम्यान, शिक्षणाधिकारी देवीदास महाजन यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी परिसरातील शाळेत समायोजन करण्याचे आश्वासन दिले आहे. नाशिक महानगरपालिकेचे तत्कालिक प्रभारी शिक्षण अधिकारी उदय देवरे यांनी गेल्या वर्षी एका कार्यक्रमात दिलेल्या आश्वासन दिल्याचा दावा करीत वडाळागावातील शाळा क्र. ८३ मध्ये नववीचा वर्ग सुरू करण्यात आला होता. परंतु, प्रशासकीय स्तरावर याविषयी शाळेच्या मुख्याध्यापकांनी शिक्षण विभागाला कोणतीही माहिती दिली नाही. अशा स्थितीत स्थानिक नागरिकांकडून महापालिकेचे शाळेकडे दुर्लक्ष होत असून, शालेत विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागा नसून शिक्षकही नसल्याची ओरड केल्याने हा प्रकार समोर आला. त्यामुळे शिक्षणाधिकारी देवीदास महाजन यांनी संबंधित वर्ग तत्काळ बंद करण्याच्या सूचना केल्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापकांनी गेल्या महिनाभरापासून शाळेत बसणाºया दहावीच्या विद्यार्थ्यांना शाळेबाहेर काढले. याप्रकारानंतर परिसरातील जमील रंगरेज यांनी संबंधित विद्यार्थ्यांना सोबत घेऊन मंगळवारी महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर निदर्शने करीत आयुक्तांच्या भेटीची मागणी केली. मात्र आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अनुपस्थितीत उपायुक्त महेशकुमार डोईफोडे यांनी काही विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांचे प्रश्न समजून घेतले. तसेच महाजन यांच्याशी चर्चेतून तोडगा काढण्याचा सल्ला दिला. त्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांनी महाजन यांची भेट घेतली. यावेळी विद्यार्थ्यांनी त्याच शाळेत नववीचा वर्ग सुरू करण्याची मागणी केली. मात्र शिक्षणाधिकाºयांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी संबंधित शाळेत शिक्षक व जागेची तरतूद होपर्यंत समायोजन करून देण्याचे आश्वासन दिले. मात्र विद्यार्थ्यांसोबत आलेल्या जमिल रंगरेज यांनी आहे सध्या सुरू असेलेल्याच ठिकाणी सध्या सुरू असेल्या स्थितीतच नववीचा वर्ग सुरू ठेवण्याची मागणी कायम ठेवल्याने महालालिका प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे.
नववीच्या वर्गासाठी विद्यार्थी रस्त्यावर ; विनापरवानगी असलेला वर्ग बंद केल्याने पेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2019 9:38 PM
नाशिकच्या वडळागावातील शाळाक्रमांक ८३ येथे विनापरवानगी सुरू असलेल्या नववीचा वर्ग बंद करण्याच्या सूचना शिक्षणाधिकारी देवीदास महाजन यांनी केल्यानंतर या वर्गात बसणाया विद्यार्थ्यांनी मंगळवारी (दि.९०) भर पावसात रस्त्यावर उतरून आम्ही शिकायचे कसे, असा सवाल करीत महापालिका आयुक्तांना भेटण्याचाा आग्रह धरला. मात्र आयुक्तांच्या अनुपस्थितीत उपायुक्त महेशकुमार डोईफोडे यांनी विद्यार्थ्यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घेत शिक्षणाधिकारी महाजन यांच्याशी समन्वयातून या प्रश्नावर तोडगा काढण्याचा सल्ला दिला. दरम्यान, शिक्षणाधिकारी देवीदास महाजन यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी परिसरातील शाळेत समायोजन करण्याचे आश्वासन दिले आहे.
ठळक मुद्देवडाळायातील नववीचा वर्ग अचानक बंद करण्याच्या सूचना परवानगी नसताना सुरू होता नववीचा वर्ग शाळेतील विद्यार्थ्यांची रस्त्यावर उतरून निदशर्ने