नाशिक : जिल्ह्यातील नववी ते बारावीच्या शाळा ४ जानेवारीपासून सुरू झाल्या असून, २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीच्या शाळाही सुरू होणार आहे. मात्र यावर्षीचा ध्वजारोहण सोहळा मोजक्यात विद्यार्थी, शिक्षक पदाधिाकाऱ्यांच्या उपस्थित साजरा केला जाणार आहे. कोरोनाचे संकट अद्यापही पूर्णपणे संपुष्टात आले नसल्याचे वास्तव लक्षात घेऊन जे विद्यार्थी, शिक्षक व शिककेतर प्रजासत्ताकदिनी उपस्थित राहतील त्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहन सोहळा पूर्ण करण्याचे नियोजन शिक्षण विभागाने केले केले आहे.
देशात २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण करून राष्ट्रीय सण साजरा केला जातो. संपूर्ण जिल्ह्यात व शहरातही प्रजासत्ताक दिनाचा मोठा उत्साह पाहायला मिळतो. वेगवेगळ्या शाळांमध्ये देशभक्तीपर गीते व सास्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यात विद्यार्थीही मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. आणि त्यातून अनेक बालकलाच्या कलागुणांनाही चालना मिळते. परंतु, यावर्षी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालकन करूनच प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार असल्याने शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थितीही मर्यादित असणार आहे. ध्वजारोहण सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी विद्यार्थ्यांना कोणतेही बंधन केले जाणार आहे. त्यामुळे बहुतांश शाळांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांशिवाय पारंपरिक पद्धतीने प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करून तिरंग्याला मानवंदना दिली जाणार आहे.
कोट-
कोरोनाचा धोका लक्षात घेता यावर्षी प्रजासत्ताक दिनी शाळांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून ध्वजारोहण केले जाईल. या सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचे विद्यार्थ्यांना बंधन नसेल. विद्यार्थी उपस्थित नसतील अशा शाळांमध्ये शिक्षक, शिक्षकेतर व मुख्याध्यापक यांच्या उपस्थिती ध्वजारोहण केले जाईल.
-नितीन उपासणी, शिक्षण उपसंचालक, नाशिक विभाग