जळगाव नेऊर : पुरणगाव (ता.येवला) येथील आत्मा मालिक इंग्लिश मिडीयम व ज्युनियर कॉलेजमध्ये पर्यावरणपूरक होळी उत्साहात साजरी करण्यात आली. कोरोना आजाराचा वाढता प्रकोप होळीत दहन होऊ दे व सर्वांना उत्तम आरोग्य लाभू दे यासाठी सामूहिक प्रार्थनादेखील करण्यात आली.होळीसाठी विद्यार्थ्यांनी शालेय भोवतालच्या परिसरातील कचरा, पालापाचोळा व वाळलेल्या झाडाच्या फांद्या गोळा करून परिसर स्वच्छ करून हा स्वच्छतेच्या या मुलमंत्राचा समाजासमोर एक नवीन आदर्श ठेवला.गुरुकुलात साजऱ्या करण्यात आलेल्या होळी सणाच्या प्रसंगी पर्यावरणाला व निसर्गाला कोणत्याही प्रकारची हानी पोहचणार नाही याची खबरदारी घेत विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी परिसरातील कचरा व पाला-पाचोळा गोळा करत इको-फ्रेन्डली होळी साजरी करण्याची प्रतिज्ञा घेतली. गुरुकुलातील सहकारी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी होळीचे पूजन केले.गुरुकुलाचे अध्यक्ष हनुमंत भोंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या या कार्यक्रमास पुरणगाव संतपीठाचे संत सेवादास महाराज, विश्वस्त प्रकाश भामरे, डॉ.सुताने, प्राचार्य, संकुलप्रमुख कार्यालयीन अधीक्षक, वसतिगृह अधीक्षक व शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी साजरी केली पर्यावरणपूरक होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 11:23 PM
जळगाव नेऊर : पुरणगाव (ता.येवला) येथील आत्मा मालिक इंग्लिश मिडीयम व ज्युनियर कॉलेजमध्ये पर्यावरणपूरक होळी उत्साहात साजरी करण्यात आली. कोरोना आजाराचा वाढता प्रकोप होळीत दहन होऊ दे व सर्वांना उत्तम आरोग्य लाभू दे यासाठी सामूहिक प्रार्थनादेखील करण्यात आली.
ठळक मुद्दे कचरा व पाला-पाचोळा गोळा करत इको-फ्रेन्डली होळी