नाशिक : बारावीच्या निकालात गेल्या वर्षांच्या तुलनेत उत्तीर्णतेचा टक्का घसरल्याचे दिसून येत असताना नाशिक महाविद्यालायातील अनेक उच्च माध्यमिका विद्यालयांचा शंभर टक्के निकाल लागला आहे. दरवर्षी अशाप्रकारे शंभर टक्के निकाल मिळविणाऱ्या विद्यालयांध्ये विज्ञान शाखा असलेल्या संस्थांचाच वरचष्मा राहत होता, परंतु यावर्षी वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनीही बारावीच्या परीक्षेत चांगली क ामगिरी केली आहे. विशेष म्हणजे घटलेल्या निकालात विज्ञान शाखेची टक्का अधिक असून, त्या तुलनेत वाणिज्य शाखेच्या विद्यार्थिंनी अधिक उजळ कामगिरी केल्याचे दिसन येत आहे.नाशिकमधून गेल्या वर्षी कलाशाखेचा ७८.९३ टक्के, वाणिज्य शाखेचा ८९.५० व विज्ञान शाखेचा ९५.८५ टक्के निकाल लागला होता, त्या तुलने यावर्षी कला ७६.४५, वाणिज्य ८८.२८ व विज्ञान शाखेचा ९२.६० टक्के निकाल लागला आहे. यावर्षी सर्वच शाखांच्या निकालांमध्ये घसरण झाली आहे. यात कलाशाखेचा निकाल २.४८ टक्क्यांनी घसरला आहे, तर वाणिज्य शाखेचा १.२२ टक्के व विज्ञान शाखेच्या निकालात सर्वाधिक ३.२५ टक्के घसरण झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून सातत्याने विज्ञान शाखेच्या निकालात प्रगती होत असताना यावर्षी घसरलेला निकाल विचार करायला लावणारा आहे.ग्रामीण भागातून वाढला निकालबारावीच्या निकालात ग्रामीण भागातील शैक्षणिक संस्थांनी निकालाचा टक्का वाढविल्याचे दिसून आले. यात प्रामुख्याने शासकीय आश्रमशाळांमधील बहुतांश शाळांचा शंभर टक्के निकाल लागला आहे. शहरी भागातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या बरोबरीने ग्रामीण भागातूनही शाळांचा शंभर टक्के निकाल लागल्याने आश्चर्य व्यक्त होत असले तरी दिंडोरीतील प्रकाशबापू कनिष्ठ महाविद्यालय, इगतपुरीतील वंडरलॅँड हायस्कूल, घोटीचे सरस्वती उच्च माध्यमिक विद्यालय, अभोण्याचे जनता विद्यालय, चणकापूर, कनाशी, गणोरे, मोहदरी येथील शासकीय आश्रमशाळा, कळणचे टी. एन. रौंदळ विद्यालय, सखूबाई कनिष्ठ महाविद्याल, व्ही. टी. कनिष्ठ आदी महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी शहरी विद्यार्थ्यांच्या बरोबरीने कामगिरी केल्याचे बारावीच्या निकालातून दिसून आले.विविध तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी द्यावा लागणाºया स्पर्धापरीक्षेमुळे विद्यार्थ्यांवर निर्माण झालेल्या तणावाचे प्रतिबिंब असल्याचे मत शैक्षणिक क्षेत्रातून व्यक्त होत आहे. त्यासोबतच बदलत्या जागतिक परिस्थितीनुसार वाणिज्य शाखेत उघडलेल्या करिअरच्या नवनवीन वाटा यामुळे गुणवंत विद्यार्थ्यांचा वाणिज्य शाखेकडे वाढलेला कलही यातून दिसून येत आहे.
कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनी निकालात घेतली भरारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 1:17 AM