नाशिक : जिल्हा परिषदेतील फाईल पेंडन्सीचा फटका जिल्हाभरातील सुमारे साडेचार लाख विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराला बसला असून, पोषण आहारातील पाककृती निश्चितीची फाईल गेल्या पंधरवड्यापासून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या स्वाक्षरीविना प्रलंबित असल्याने विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराचे वेळापत्रकही रखडले असून, विद्यार्थ्यांना पोषण आहारापासून वंचित राहावे लागत आहे.सर्व शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यात येतो. परंतु यंदा शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच तांदूळ व अन्य मालाच्या पुरवठ्याची प्र्रक्रिया रखडली होती. त्यामुळे शिक्षण विभागाने संबंधित मुख्याध्यापकांना स्थानिक पातळीवर धान्य खरेदी करून मुलांना पोषण आहार पुरविण्याचे आदेश दिले होते. तसेच पोषण आहार बनविणाºया बचत गटांची बिले नोटाबंदीनंतर जिल्हा बँकेत अडकल्याने बचत गटांनी धान्य खरेदी करून विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरविण्यास नकार दिला होता. त्यामुळे अनेक शाळांमधील पोषण आहार बंद झाल्याची ओरड झाल्यानंतर तांदळासह अन्य साहित्य पुरवठ्याची निविदाप्रक्रिया राबविली गेली.या निविदांप्रमाणे ३० नोव्हेंबरला पुरवठादारांबरोबरचा करार संपुष्टात आला असताना शिक्षण विभागाकडून झालेल्या दिरंगाईमुळे पुरवठादारांना वेळेत आदेश प्राप्त होऊ शकलेले नाहीत. शासकीय आदेशाप्रमाणे सहा दिवसांपैकी तीन दिवस पोषण आहारात तूरडाळीचा समावेश करणे बंधनकारक केले असून, ही तूरडाळ राज्य पणन महासंघाकडून खरेदी करण्याच्या सूचना आहेत. तर तीन दिवसांसाठीची पाककृती राज्य शासनाकडून तयार आहे. परंतु, या वेळापत्रकात स्थानिक पातळीवरील बदलांसाठी मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या परवानगीची आवश्यकता असते. या परवानगीसाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मिणा यांच्या दालनात ४ डिसेंबरला संबंधित फाईल सादर करण्यात आली होती.परंतु, काही तांत्रिक बाबींवर चर्चेनंतर या फाईलवर स्वाक्षरी होऊ शकलेली नाही. त्यानंतर ८ डिसेंबरलाही सदर फाईल स्वाक्षरीविना पडून राहिली, त्यानंतर मिणा परगावी गेलेले असल्याने संबंधित पाककृती वेळापत्रकाची फाईल गेल्या पंधरवड्यापासून पडून आहे. विशेष म्हणजे गतिमान प्रशासनाचा दावा करणाºया प्रशासकीय अधिकाºयांकडूनच अशाप्र्रकारची दिरंगाई होत असल्याने जिल्हा परिषदेत सध्या फाईल पेंडन्सीचा विषय चर्चेत आहे.
नाशिकला पोषण आहारापासून विद्यार्थी वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 1:26 PM
नाशिक : जिल्हा परिषदेतील फाईल पेंडन्सीचा फटका जिल्हाभरातील सुमारे साडेचार लाख विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराला बसला असून, पोषण आहारातील पाककृती निश्चितीची फाईल गेल्या पंधरवड्यापासून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या स्वाक्षरीविना प्रलंबित असल्याने विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराचे वेळापत्रकही रखडले असून, विद्यार्थ्यांना पोषण आहारापासून वंचित राहावे लागत आहे.सर्व शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना ...
ठळक मुद्देपाककृती वेळापत्रक रखडलेफाईल पेंडन्सी