सिन्नर : विद्यार्थ्यांना कृतियुक्त शिक्षणातून व्यावहारिक ज्ञान मिळते. यासाठी स्काउट-गाइडच्या आनंदमेळ्याची गरज असते. आनंदमेळ्यातून विद्यार्थ्यांना जीवन जगण्याची कला मिळते, असे प्रतिपादन मविप्रचे माजी संचालक कृष्णा भगत यांनी केले.येथील लोकनेते शं. बा. वाजे विद्यालयात स्काउट-गाइड आनंदमेळ्याच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. व्यासपीठावर शालेय समितीचे सदस्य आर. जे. थोरात, शालिनी देशमुख, लता गुठळे, मुख्याध्यापक साहेबराव शिंदे, उपमुख्याध्यापक एस. एन. लोहकरे, पर्यवेक्षक जी. एस. खैरनार आदी उपस्थित होते. या प्रसंगी लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. मुख्याध्यापक साहेबराव शिंदे यांनी प्रास्ताविक केले. आनंदमेळ्यात विद्यार्थ्यांनी मिसळपाव, वडापाव, दाबेली, पाववडा आदी खाद्यपदार्थांसह गाढवाला शेपूट लावणे, स्टम्प मध्ये रिंग टाकणे, वाटीत नाणे टाकणे, बादलीत चेंडू टाकणे, एका काडीत दहा मेणबत्या पेटविणे आदी खेळांचे स्टॉल्स उभारून खरेदी-विक्रीचा व्यवहार समजून घेतला. विद्यार्थ्यांसह उपस्थितांनी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतानाच मनोरंजनात्मक खेळांचा आनंदही लुटला. आनंदमेळ्यामुळे शालेय परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते. विविध खाद्यपदार्थांची खरेदी करण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी उसळली होती. स्काउट समितीप्रमुख आर. व्ही. वाजे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी एस. बी. चांदोरे, मनीषा बनकर, सोमनाथ गिरी, अर्चना पाटील, मनोहर कर्डेल, भागवत आरोटे, मिलिंद डावरे, संदीप पगार, कचरेश्वर शिंदे, बी. एस. देशमुख, व्ही. एन. शिंदे, एन. पी. बागुल, वैशाली वाजे, पी. आर. पवार, एस. टी. पांगारकर, पी. आर. फटांगळे आदींसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. विविध मनोरंजनात्मक खेळातून विद्यार्थ्यांना आनंद प्राप्त होतो. पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यवहार ज्ञान व स्व-कमाईचा आनंद मिळतो. या अशा मेळ्यातून विद्यार्थ्यांच्या मनात श्रमप्रतिष्ठा या मूल्याची रूजवण होते, असे भगत यांनी सांगितले.
आनंदमेळ्यातून विद्यार्थ्यांना मिळते जीवन जगण्याची कला कृष्णा भगत : वाजे विद्यालयात स्काउट-गाइडचा कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 11:39 PM
सिन्नर : विद्यार्थ्यांना कृतियुक्त शिक्षणातून व्यावहारिक ज्ञान मिळते. यासाठी आनंदमेळ्याची गरज असते. आनंदमेळ्यातून विद्यार्थ्यांना जीवन जगण्याची कला मिळते, असे प्रतिपादन कृष्णा भगत यांनी केले.
ठळक मुद्देखरेदी-विक्रीचा व्यवहार समजून घेतलाशालेय परिसराला यात्रेचे स्वरूप