नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील दापूर येथे स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अभियानांतर्गत ग्रामपंचायतीच्या वतीने जनजागृती फेरी काढण्यात आली. यावेळी गावातील व्यावसायिकांकडून प्लॅस्टिकचे संकलन करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. सरपंच मुक्ता मोरे, उपसरपंच अशोक काळे, ग्रामविकास अधिकारी पी. एस. काशिद यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रभातफेरीद्वारे प्रबोधन केले. विद्यार्थ्यांनी प्लॅस्टिक हटवा, निसर्ग वाचवाच्या घोषणा देत ग्रामस्थांचे लक्ष वेधले. व्यावसायिकांना प्लॅस्टिकबंदीबाबत ग्रामपंचायतीकडून नोटिसा देण्यात आल्या. ग्रामविकास अधिकारी प्रदीप काशिद यांनी ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करू न घरोघरी होणाऱ्या सर्वेक्षणाची माहिती दिली. प्लॅस्टिकमुक्ती व शौचालय वापर याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य श्रीराम काकड, श्रीराम आव्हाड, योगेश आव्हाड, भाऊसाहेब मोरे, सोमनाथ आव्हाड, अशोक आव्हाड, निशा आव्हाड, रंजना केदार, भीमाबाई आव्हाड, अर्चना आव्हाड, शारदा आव्हाड, अर्जुन आव्हाड आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी दिला प्लॅस्टिक हटावचा नारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 7:39 PM