सिन्नर : गावाच्या विकासाला वाहून घेणाºया ग्रामपंचायतला भेट देऊन माध्यमिक लोकशिक्षण मंडळाच्या देवपूर हायस्कूल व एस. जी. कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी गावविकासासाठी आवश्यक असणाºया सर्व बाबींची माहिती जाणून घेत गावकारभाराचे आपले कुतूहलही शमविले. शालेय अभ्यासक्र मातील क्षेत्रभेट उपक्रमांतर्गत उपशिक्षक रामेश्वर मोगल यांनी विद्यार्थ्यांची देवपूर ग्रामपंचायत कार्यालयाला भेट घडवून आणली. सरपंच संजय गडाख व कर्मचारी अनिल गडाख यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या मनात घोंगावणाºया अनेक शंकांचे निरसन सरपंच गडाख यांच्याकडून करून घेतले. गावविकासासाठी मिळणारा निधी, घरपट्टी, पाणीपट्टी व इतर कर यांची आकारणी व वसुली याबाबत विद्यार्थ्यांनी चिकित्सक प्रश्न विचारले. ग्रामपंचायतमध्ये असलेले विविध अभिलेख व त्यांचे उपयोग यांची माहिती सरपंच यांनी दिली. सदस्य व ग्रामसेवक यांची जबाबदारीही सांगितली. गावविकासाच्या नव्या संकल्पनाही विद्यार्थ्यांना सांगितल्या. संगणकीय कामकाजाची माहिती यावेळी विद्यार्थ्यांनी घेतली. यावेळी मुख्याध्यापक विद्या साळुंखे, उपशिक्षिका सुमन मुंगसे, सुनील पगार, वैशाली पाटील, आर. वाय. मोगल, प्रमोद बधान, नानासाहेब खुळे आदी शिक्षक उपस्थित होते. यावेळी वंदना बोºहाडे, श्रद्धा बोºहाडे, शीतल गडाख, सिद्धी शिरोळे, विनंती शिंदे, प्राजक्ता गायकवाड, गौरव शेळके, तेजस गडाख, संदेश आव्हाड, सूरज उगले, दीप्ती रानडे, गौरी रानडे, वृषाली आंधळे आदी विद्यार्थ्यांनी चर्चेत सहभाग घेतला.
गावाच्या विकासाला वाहून घेणाºया ग्रामपंचायतला भेट विद्यार्थ्यांनी जाणून घेतले गावकारभाराचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2018 11:38 PM
सिन्नर : ग्रामपंचायतला भेट देऊन माध्यमिकहायस्कूल व एस. जी. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सर्व बाबींची माहिती जाणून घेत कुतूहलही शमविले.
ठळक मुद्देअनेक शंकांचे निरसन संगणकीय कामकाजाची माहिती