शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

उत्तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना नासाच्या संशोधकांशी थेट संवादाची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2018 5:14 PM

मराठा विद्या प्रसारक समाज व नॅशनल स्पेस सोसायटीच्या (युएसए) नाशिक शाखेतर्फे संयुक्तरीत्या ४ ते १० आॅक्टोबरदरम्यान ‘वर्ल्ड स्पेस विक’ साजरा करणार असल्याची माहिती मविप्रच्या सरचिटणीस निलिमा पवार व युएसएच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष अविनाश शिरोडे यांनी शुक्रवारी (दि.७)दिली असून जगभरात असा प्रयोग पहिल्यांना नाशिकमध्येच होत असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला आहे. 

ठळक मुद्दे४ ते १० आॅक्टोबरदरम्यान ‘जागतिक अंतराळ सप्ताह मविप्र आणि युएसएच्या नाशिक शाखेतर्फे आयोजनइस्रो आणि नासाचे संशोधक साधणार विद्यार्थ्यांशी संवाद

नाशिक : वर्ल्ड स्पेस सप्ताहानिमित्त मविप्र व नॅशनल स्पेस सोसायटीतर्फे (युएसए)निबंध,पोष्टर व मॉडेल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले या सप्ताहादरम्यान विद्यार्थ्यांना थेट इस्रो आणि नासाच्या संशोधकांनी थेट प्रेक्षपणाच्या माध्यमातून संवाद साधता येणार आहे. मराठा विद्या प्रसारक समाज व नॅशनल स्पेस सोसायटीच्या (युएसए) नाशिक शाखेतर्फे संयुक्तरीत्या ४ ते १० आॅक्टोबरदरम्यान ‘वर्ल्ड स्पेस विक’ साजरा करणार असल्याची माहिती मविप्रच्या सरचिटणीस निलिमा पवार व युएसएच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष अविनाश शिरोडे यांनी शुक्रवारी (दि.७)दिली असून जगभरात असा प्रयोग पहिल्यांना नाशिकमध्येच होत असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला आहे. जागतिक अंतराळ सप्ताहादरम्यान आठवी ते बारावी व महाविद्यालयीन अशा दोन गटात निबंध,पोष्टर व मॉडेल स्पर्धा होणार आहे. निबंध स्पर्धेत स्पेस युनिटस द वर्ल्ड, अंतराळ ही एक संकल्पना आहे. चंद्र/मंगळ शोध आणि वसाहत, अंतराळातील खनीज संसाधने, अंतराळातील शेतकरी, अंतराळातील कचºयाची हाताळणी, अंतराळ वाहतूक, अंतराळातील सौरउर्जा अशा विषयांवर विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेत १५०० शब्दांमध्ये संगणकीकृत निबंधलेखनाचा सारांश व मुख्य निबंध तीन प्रतींमध्ये १५ सप्टेंबरपर्यंत तर पोष्टर व मॉडेल ३० सप्टेंबरपर्यंत मराठा विद्या प्रसारक समाजाच्या मध्यवर्ती कार्यालयात समक्ष येऊन जमा कराव्या लागणार आहे. अंतराळ सप्तहात विद्यार्थ्यानी बनविलेले पोष्टर्स, माडेल्स आणि इस्त्रोने खास पाठविलेले मॉडेल्स रोज संध्याकाळी ४ ते ७ यावेळी बघण्याची सधी नागरिकांनाही मिळणार आहे. या स्पर्धांमध्ये सहभागी होऊ इच्छिणाºया विद्यार्थ्यांनी अविनाश शिरोडे, डॉ.ओमप्रकाश कुलकर्णी, विजय बाविस्कर व मविप्रचे शिक्षणाधिकारी प्रा.एस.के.शिंदे डॉ.एन.एस.पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन मविप्र व युएसएच्या नाशिक शाखेतर्फे करण्यात आले आहे.

एक हजार विद्यार्थ्यांचा सहभाग जागतिक अंतराळ सप्ताहची सुरुवात, अंतराळ विज्ञान व क्षेत्र, इस्त्रोची अभिमानास्पद भव्य कामगिरी, अंतराळ क्षेत्रांत कार्यरत संस्था याविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने ४ आॅक्टोबर २०१८ ला शोभायात्रेने होईल. या शोभायात्रेत उद्बोधक फलकांसह सुमारे १००० विद्यार्थी, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि  इस्त्रोच्या पीएसलव्हीसह विविध प्रतिकृतीही सहभागी होणार आहे. 

टॅग्स :Educationशिक्षणtechnologyतंत्रज्ञानStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालय