पिंपळगाव बसवंत: सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात आधुनिक जीवनशैलीत पर्यावरणाकडे लक्ष द्यायला नव्या पिढीला वेळ नाही. परंतु बी. पी पाटील ज्युनिअर कॉलेज आॅफ सायन्स पिंपळगावच्या विद्यार्थ्यांनी आपले वेगळे पण जपत निसर्गाशी आपले नाते घट्ट करण्यासाठी कळसुबाईच्या शिखर रांगेत उभा ठाकलेल्या रतनगडावर ट्रेकीगला जाऊन एक नवीन अनुभव घेतला.दिनेश अनारसे व प्राचार्य प्रकाश भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली १३५ विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी प्रवरा नदीचे उगमस्थान असलेल्या रतनगडावरील निसर्गसौंदर्याचा पुरेपूर आस्वाद घेतला.दाटझाडी व खोल दरी अशा दुहेरी निसर्ग सौंदर्यचा अनुभव घेत विद्यार्थ्यांनी गडावर स्वच्छता केली.हा ट्रकिंग कँप यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कावेरी देवरे, मीनाक्षी जाधव, .दिपाली लोखंडे, पुनम निफाडे, अनुजा सातपुते, रोहिणी जाधव ,चंद्रकांत नायकवाडे, किरण रायते, प्रमोद रिकबे , योगेश्वर शिरसाठ , सुनिल राठोड व पिंपळगाव हायस्कूलचे क्र ीडाशिक्षक .नितिन डोखळे आदींनी परिश्रम घेतले.