शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
7
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
8
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
9
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
10
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
11
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
12
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
13
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
14
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
15
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
16
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
17
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
18
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
19
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

विद्यार्थ्यांनी गिरवला ‘वाचाल तर वाचाल’चा धडा

By admin | Published: October 16, 2016 2:06 AM

वाचन प्रेरणा दिन : शाळांमध्ये दिवंगत राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त सामूहिक पुस्तक वाचन

नाशिक : शहरातील विविध शाळांमध्ये दिवंगत राष्ट्रपती ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यार्थ्यांनी थोर पुरुषांच्या चरित्र ग्रंथाचे सामूहिक वाचन केले. तसेच ग्रंथदिंडी व ग्रंथ प्रदर्शन आदि कार्यक्रमदेखील राबविण्यात आले.महात्मा गांधी प्राथमिक विद्यामंदिरजनता सेवा मंडळ संचलित महात्मा गांधी प्राथमिक विद्यामंदिर या शाळेत डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यासाठी व विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची प्रेरणा निर्माण होण्यासाठी महापौर अशोक मुर्तडक यांनी शाळेस वाचनालयास ५0 पुस्तकांची भेट दिली. वाचनालयाच्या वतीने महापौरांचे आभार मानण्यात आले.रचना विद्यालयनाशिक येथील महाराष्ट्र समाज सेवा संघ संचलित रचना विद्यालय माध्यमिक विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. मुख्याध्यापक सुचेता येवला, संगीता टाकळकर, सुनील गायकवाड यांच्या हस्ते डॉ. कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी मोहाडकर, अहिरे, खळे, कुलकर्णी, पारनेरकर उपस्थित होते. सूत्रसंचालन गांगुर्डे यांनी केले.नवरचना विद्यालयमहाराष्ट्र समाज सेवा संघ संचलित नवरचना विद्यालय प्राथमिक विभागात वाचन, प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला प्रभारी मुख्याध्यापक राजेंद्र गोसावी व आशा वायकंडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. माया आचार्य यांनी प्रास्ताविक केले. प्रीती चौधरी यांनी सूत्रसंचालन केले.रमाबाई आंबेडकर विद्यालयरमाबाई आंबेडकर कन्या विद्यालयात पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड जयंती व डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमासाठी अपरांती अकॅडमीचे संचालक डॉ. संजय अपरांती, रमाबाई विद्यार्थिनी वसतिगृहाचे सचिव पी. के. गायकवाड उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन करून झाली. त्याचप्रमाणे वाचन प्रेरणा दिनानिमित विद्यार्थिनींचे वाचन घेण्यात आले. या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष करुणासागर पगारे, संस्थेचे सरचिटणीस हेमंत वाघ, वामनराव गायकवाड, नितीन भुजबळ आदि पालक शिक्षक संघ सदस्य मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन कीर्ती कदम यांनी केले. माधुरी जाधव यांनी आभार मानले.न्यू इरा स्कूलन्यू इरा शाळेत डॉ. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन दिन साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना निरनिराळ्या विषयासंबंधी पुस्तके देण्यात आली. विद्यार्थ्यांनी वाचनाचा आनंद घेतला. तसेच परिपाठाद्वारे डॉ. अब्दुल कलाम यांचा जीवनपरिचय करून दिला.महात्मा गांधी विद्यामंदिरजनता सेवा मंडळ संचलित महात्मा गांधी प्राथमिक विद्यामंदिर, येथे वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष गं. पां. माने संचालक सुनंदा माने, स्नेहलता येलमामे आदि उपस्थित होते. मुख्याध्यापक आशा जाधव यांनी वाचनाचे महत्त्व समजाविले.