मानोरी : उन्हाच्या तीव्रतेमुळे चिमणी, कावळे, साळुंकी आदी पक्ष्यांचे पाण्याअभावी खुप हाल होत असून त्यांचा जीव वाचविण्याकरीता जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरात दाणा-पाण्याची सोय केली.मागील दहा ते पंधरा दिवसापूर्वी मानोरी गावच्या वेशीत तसेच झाडावर, अंगणात दररोज सकाळी नित्यनियमाने पक्ष्यांचा किलबीलाट मोठ्या प्रमाणात ऐकु येत होता. परंतु वातावरण अचानक झालेल्या बदलामुळे येवला तालुक्यात मागील आठ ते दहा दिवसापासून उष्णतेचा पारा चाळीशी पार गेल्याने विविध प्रकारच्या पक्ष्यांचा किलबीलाट कमी झाल्याचे दिसून येत आहे. मानोरीत काही दिवसांपूर्वी सार्वजनिक पाणवठे, पिण्याच्या पाण्याच्या टाकीजवळ साचलेले पाणी, डबके अशा विविध ठिकाणी चिमणी, कावळे, साळुंकी, करकोचे, आदी पक्षी पाणी पिताना दिसून येत होते. एकीकडे पिण्याच्या पाण्याची टंचाई अचानक उष्णता वाढल्याने या पक्ष्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.अशातच येवला तालुक्यातील मानोरी बुद्र्ुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक अगरचंद शिंदे आणि शिक्षक राजू सानप यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील जून महिन्यात नवागत विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आलेल्या वृक्षांनाच टाकाऊ वस्तूंपासून बनवलेल्या बाटल्या कापून तसेच नरसाळे आदींना झाडांच्या मध्यभागी बांधून या भटकत्या चिमण्या, कावळे, साळुंक्या आदी पक्ष्यांच्या दणापाण्याची सोय करून भर उन्हात होणारी पक्ष्यांची भटकंती थांबविली.यावेळी समृद्धी मुदगुल, साहिल भवर, ऋग्वेद शेळके, शुभम तिपायले, राहुल तिपायले, अनुष्का भवर, अमित शेळके, कोमल डुकरे, अस्विनी तिपायले, पायल पवार, साहिल खैरनार आदी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
शाळेतील विद्यार्थ्यांनी केली पक्ष्यांच्या दाणा-पाण्याची सोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2019 6:54 PM
मानोरी : उन्हाच्या तीव्रतेमुळे चिमणी, कावळे, साळुंकी आदी पक्ष्यांचे पाण्याअभावी खुप हाल होत असून त्यांचा जीव वाचविण्याकरीता जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरात दाणा-पाण्याची सोय केली.
ठळक मुद्देपक्ष्यांच्या दणापाण्याची सोय करून भर उन्हात होणारी पक्ष्यांची भटकंती थांबविली.