नाशिक :विद्यार्थी जीवनात विविध प्रयोगाच्या माध्यमातून नवनवीन निर्मिती करू शकतो, त्यासाठी प्रत्येकाने प्रयोगशील राहिले पाहिजे, असे मत नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले. विज्ञान दिनाच्या पार्श्वभूमीवर जु. स. रुंग्टा हायस्कूलच्या सभागृहात शुक्रवारी (दि.२८) वैज्ञानिक प्रकल्प प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर मुख्याध्यापक डी. डी. आहिरे, संस्थेचे माजी सचिव अरुण पैठणकर, ज्येष्ठ विज्ञान शिक्षक श्रावण सूर्यवंशी, नीलिमा कांगणे उपस्थित होते. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरामध्ये विज्ञान असून, विज्ञान शिकताना प्रयोगशील असले पाहिजे. एखाद्या प्रयोगात अपयश आले तरी त्यात सातत्य ठेवावे. त्यातूनच यशाचा मार्ग निघेल, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. विज्ञार्थ्यांनी तयार केलेल्या वैज्ञानिक प्रकल्पांमधील ज्वालामुखीच्या प्रतिकृतीतून रसायनांच्या सहाय्याने ज्योत पेटवून ज्वाला व धूर यांचे विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. विज्ञान दिनाविषयी सचिन कुलकर्णी यांनी माहिती दिली. दरम्यान, आठवीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘शास्त्रज्ञांचा जीवन परिचय’ या हस्तलिखिताचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले. त्यांना विज्ञान शिक्षक श्रावण सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले होते. प्रदर्शनातील प्रकल्पातून आदित्य पगारे याने प्रथम क्रमांक, तर मिथिलेश राठोड याने द्वितीय क्रमांक पटकावला. सूत्रसंचालन उमा लोकरे यांनी केले, तर आभार दीपक गायकवाड यांनी मानले.
विद्यार्थ्यांनी प्रयोगशील असावे- प्रसाद कुलकर्णी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 4:57 PM
विद्यार्थी जीवनात विविध प्रयोगाच्या माध्यमातून नवनवीन निर्मिती करू शकतो, त्यासाठी प्रत्येकाने प्रयोगशील राहिले पाहिजे, असे मत नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
ठळक मुद्देविज्ञान दिनानिमित्त रुंगटा शाळेत प्रदर्शनविद्यार्थ्यांना प्रयोगशील बनण्याचे मार्गदर्शन