नाशिक : विद्यार्थ्यांनी कोविड परिस्थितीचे अवलोकन करून स्थानिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी संशोधनात्मक प्रयत्न करावेत. तसेच विद्यापीठाने संशोधनासाठी विविध अभ्यासक्रम व उपक्रम घ्यावेत त्याचा भविष्यात समाजाला मोठ्या प्रमाणात उपयोग होणार असल्याचे प्रतिपादन डॉ. राष्ट्रीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे माजी संचालक डॉ. रमण गंगाखेडकर यांनी केले आहे.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा २३वा वर्धापन दिन प्रभारी कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर डॉ. कालिदास चव्हाण, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक, वित्त व लेखाधिकारी एन. व्ही. कळसकर, विद्यार्थी कल्याण विभागाचे प्रसंचालक संदीप कुलकर्णी, विद्यापीठ प्राधिकरण सदस्य आदी उपस्थित होते. डॉ. रमण गंगाखेडकर म्हणाले, समाजोपयोगी संशोधनासाठी ऊर्मी व इच्छाशक्ती महत्त्वाची असून कोणत्याही क्षेत्रात प्रगती करावयाची असेल तर संशोधन होणे गरजेचे आहे. त्यासाठी शिक्षण घेताना मुलांना वैचारिक स्वातंत्र्य देण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे त्यांची सामाजिक व शैक्षणिक इच्छाशक्ती प्रबळ होईल. विद्यापीठाने शिक्षक व विद्यार्थ्यांकरिता जास्तीत जास्त प्रशिक्षण कार्यशाळा घेतल्यास प्रगतीला नवी दिशा मिळेल, असेही त्यांनी नमूद केेले. दरम्यान, पर्यावरण संवर्धनासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून सर्व संलग्नित महाविद्यालयात वृक्षारोपण करण्याचे निर्देश विद्यापीठाकडून देण्यात आले. तसेच विद्यापीठ आवारात डॉ. नितीन करमाळकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्निल तोरणे यांनी केले.
कोट -
विद्यापीठ आवारात नव्याने सुरू होणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा उपयोग समाजाला होणार आहे. आरोग्य क्षेत्रात संशोधन व कार्य करण्यासाठी मोठ्या प्रमाणात संधी आहेत त्याचा विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी उपयोग करावा. विद्यापीठाकडून घेण्यात येणाऱ्या कार्यशाळा व उपक्रमात सहभाग घेऊन व्यापक संशोधन करावे.
- डॉ. नितीन करमळकर, प्रभारी कुलगुरू, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ
===Photopath===
100621\10nsk_14_10062021_13.jpg
===Caption===
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आवारात वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपन करताना प्रभारी कुलगुरू डॉ. नितिन करमाळकर, समवेत डॉ. कालिदास चव्हाण, डॉ. अजित पाठक, एन. व्ही. कळसकर, संदीप कुलकर्णी आदी